अभिनेता हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्या 'अग्निपथ' चित्रपटात अभिनेत्री कनिका तिवारीने भूमिका साकारली होती. गेल्या दहा वर्षांत कनिकाचा लूक प्रचंड बदलला असून आताचे तिचे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल!
'अग्निपथ'मध्ये कनिकाने हृतिकच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या निरागस अभिनयाने चाहत्यांनी मनं जिंकली होती. 'अग्निपथ' प्रदर्शित होऊन जवळपास दहा वर्षे झाली आणि या दहा वर्षांत कनिकाच्या लूकमध्ये झालेला बदल..
कनिका अजूनही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे. सोशल मीडियावर ती तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. 'अग्निपथ' चित्रपटातूनच तिने अभिनयविश्वात पदार्पण केलं होतं. 'अग्निपथ'नंतर तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. कनिकाने तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फार क्वचित लोकांना माहित असेल की ती प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची चुलत बहीण आहे. कनिका लवकरच श्रेयस तळपदेच्या 'मन्नू और मुन्नी की शादी' या चित्रपटात झळकणार आहे. कनिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. १५ वर्षांची असताना कनिकाने 'अग्निपथ'मध्ये काम केलं होतं. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.