Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

Scam 2010 The Subrata Roy Saga: हंसल मेहता यांनी त्यांच्या 'स्कॅम 2010 द सुब्रत रॉय सागा' या वेब सीरिजची घोषणा केली आहे.
हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...
'स्कॅम-3'SAKAL

Scam 3 Announced: प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांच्या स्कॅम 1992 (Scam 1992) आणि स्कॅम 2003 (Scam 2003) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. स्कॅम 1992 या वेब सीरिजमध्ये हर्षद मेहताची गोष्ट मांडण्यात आली होती, तर स्कॅम 2003 या सीरिजमध्ये तेलगीची गोष्ट दाखवण्यात आली होती. अशातच आता हंसल मेहता यांनी स्कॅम-3 ची (Scam 3) घोषणा केली आहे. या वेब सीरिजमध्ये कोणत्या घोटाळ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

हंसल मेहता यांच्या 'स्कॅम-3' ची घोषणा

हंसल मेहता यांनी त्यांच्या 'स्कॅम 2010 द सुब्रत रॉय सागा' या वेब सीरिजची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करुन स्कॅम-3 या वेब सीरिजची घोषणा केली आहे. या व्हिडीओमध्ये एक अॅनिमिटेड कॅरेक्टर दिसत आहे. या व्हिडीओला हंसल मेहता यांनी कॅप्शन दिलं, "स्कॅम इज बॅक! स्कॅम 2010 द सुब्रत रॉय सागा, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला"

स्कॅम-3 मध्ये दाखवण्यात येणार सुब्रत रॉय यांची गोष्ट

सुब्रत रॉय हे सहारा ग्रुप ऑफ बिझनेसचे संस्थापक होते. गुंतवणुकदारांसोबत फसवणुक केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली. 2014 मध्ये 10,000 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याने त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होते. 2016 मध्ये ते पॅरोलवर ते तुरुंगाच्या बाहेर आला. सेबीने सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे पॅरोल रद्द केल्यानं त्यांनी पुन्हा तुरुंगात जावं लागलं. सुब्रत रॉय यांचे 2023 मध्ये 75 व्या वर्षी निधन झाले.

आता स्कॅम-3 या वेब सीरिजमध्ये सुब्रत रॉय यांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...
सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर सहारा प्रकरणावर सेबीची प्रतिक्रिया; काय म्हणाल्या माधबी पुरी बुच?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com