फोटोग्राफी

चाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण;बस व वाहनांची जाळपोळ

सकाळ डिजिटल टीम

चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 30) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या बस आणि पीएमपीच्या (शहर वाहतूक सेवा) सुमारे 25 बस आणि मालवाहू ट्रक, पोलिसांची वाहने, तसेच पोलिस चौकी जाळली. पोलिस अधिकाऱ्यांनी जमावावर नियंत्रण आणल्यानंतर सायंकाळी सहा वाजता महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. या आंदोलनामुळे नाशिक, नगर, कोल्हापूर, मुंबई या शहरांकडे जाणारी वाहतूक दुपारनंतर खंडीत झाली होती. या वेळी जमावाने शंभरहून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली. या वेळी जमावाकडून दोन पोलिस अधिकारी व एक पोलिस कर्मचारी यांनाही मारहाण करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली. या जमावाला आवरणे पोलिसांना अवघड झाले होते.बसस्थानकासमोरील शासकीय वाहने आणि काही बस पेटवून दिल्यानंतर जमावाने दुपारी अडीचच्या सुमारास चाकण पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. पोलिस ठाण्यावर दगडफेक करून खिडक्‍यांच्या काचा फोडल्या आणि ठाण्यासमोरील वाहने पेटवून दिली.फोटो काढणाऱ्यांना मारहाण  दरम्यान, सरकारी व खासगी कार्यालयांमधून सायंकाळी घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. या वेळी जाळपोळ आणि मोडतोड झालेल्या वाहनांचे फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांनाही संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025 : बिहारच्या मतदार याद्यांमध्ये घोळ? आढळले चक्क नेपाळ, बांगलादेश अन् म्यानमारचे नागरिक

चाकूने वार करत डोकं भिंतीवर आपटलं!अभिनेत्रीला नवऱ्याने केली मारहाण, डोळ्यात मिरी पावडर फेकून केले वार

WHO Action : WHO कडून शेख हसीना यांना मोठा धक्का, मुलगी सायमा वाजिद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; पदावरून केली हकालपट्टी?

Lumpy Affected:'साेलापूर जिल्ह्यात ९०० जनावरे लम्पीबाधित'; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

Shravan 2025 Upvas Recipe: श्रावणात उपवासासाठी बनवा गरमागरम भगर-आमटी, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT