Indian Premier League 2022 start soon foreign players will not play IPL matches
Indian Premier League 2022 start soon foreign players will not play IPL matches sakal
फोटोग्राफी

IPL 2022 : हे विदेशी खेळाडू मुकणार आयपीएलचे सामने?

Kiran Mahanavar

इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL) लवकरच सुरू होणार आहे पहिला सामना 26 मार्च रोजी मुंबईत होणार आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने असतील. पण यावेळी आयपीएल संघांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण अनेक आंतरराष्ट्रीय प्लेयर आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्याला मुकू शकतात.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील सध्या सुरू असलेली कसोटी मालिका २८ मार्च रोजी संपणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटीनंतर, एक वनडे मालिकाही होणार आहे, जी 5 एप्रिल रोजी संपणार आहे.
याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील वनडे, कसोटी मालिका १२ एप्रिलला संपणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे अनेक मोठे प्लेयर आयपीएलमध्ये सहभागी होतात, बीसीसीआयने या मालिकेबाबत आफ्रिकन बोर्डाशीही चर्चा केली आहे.
कोणत्या संघाचे प्लेयर आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्याला मुकू शकतात? त्यात चेन्नई सुपर किंग्जचा ड्वेन प्रिटोरिस, मुंबई इंडियन्सचा जोफ्रा आर्चर, कोलकाता नाईट रायडर्सचा पॅट कमिन्स, अॅरॉन फिंच यांचा समावेश आहे.
याशिवाय राजस्थान रॉयल्सच्या रासी व्हॅन डेर दुसे, सनरायझर्स हैदराबादचा मार्को जॅन्सन, शॉन अॅबॉट, एडन मार्कराम या खेळाडूंचा समावेश आहे.
सर्वात जास्त नुकसान दिल्ली आणि लखनौच्या संघाचे होत आहे. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, अँरिक नोर्किया (दुखापत), मुस्तफिझूर रहमान, दिल्ली कॅपिटल्सच्या लुंगी एनगिडी या खेळाडूंचा समावेश आहे.
तर लखनौ सुपर जायंट्सचे मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, काइल मेयर्स, मार्क वुड, क्विंटन डी कॉक सुरुवातीच्या सामन्यांना मुकू शकतात.
बेंगळुरूचे तीन खेळाडू, जेसन बेहरेनडॉर्फ, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड, पंजाब किंग्जचे जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, नॅथन एलिस आणि गुजरात जायंट्सचे डेव्हिड मिलर, अल्झारी जोसेफ यांनाही वगळले जाऊ शकते.
आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे आणि अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. तर शेवटचा साखळी सामना 22 मे रोजी होणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये 12 डबल-हेडर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअप अकाऊंट; नागरिकांकडे पैशांची मागणी

आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT