भारतीय रेल्वेने देशाच्या जवळपास प्रत्येक भागाला स्पर्श केला आहे. तुम्ही कधी रेल्वेने प्रवास केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेलच की रेल्वे आपल्या इंजिनात शक्तिशाली एअर हॉर्नचा वापर करते. यामुळे रेल्वेमध्ये हॉर्न लावले जातात, जेणेकरून गार्ड्सपासून ते रेल्वे कर्मचारी, प्रवासी आणि रेल्वेच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला सतर्क केलं जातं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रेल्वेमध्ये 11 प्रकारचे हॉर्न असतात. या हॉर्न चे वेगवेगळे अर्थ आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.चालकचालक
रेल्वेच्या चालकने लहान हॉर्न वाजवला तर त्याचा अर्थ रेल्वे यार्डात आली आहे आणि ती साफ सफाई करण्याची वेळ झाली आहे. रेल्वे प्रवासाला तयार झाल्यावर गाडीचा चालक हॉर्न वाजवतो. या हॉर्नच्या माध्यमातून तो गार्डला रेल्वे धावायला तयार आहे, पुढे जाण्याचा सिग्नल देतो, असा इशारा करतो. आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनमध्ये तीन हॉर्न वाजवले जातात. म्हणजेच चालकाचे इंजिनवरील नियंत्रण सुटले आहे. त्यामुळे तो या हॉर्नमधून गार्डला व्हॅक्युम ब्रेक लगेच ओढण्याचा इशारा करतो. मात्र, त्याचा वापर क्वचितच होतो.ट्रेनमध्ये तांत्रिक अडचण असेल तर चालक चार वेळा हॉर्न वाजवू शकतो. याचा अर्थ असा की इंजिन पुढे जाण्याच्या स्थितीत नाही.जर तुम्ही कधी रेल्वेमधून प्रवास करत असाल आणि रेल्वे धावण्याची वेळ आली असेल आणि चालक एक लांब आणि लहान हॉर्न वाजवत असेल, तर तुम्हाला समजेल की तो गार्डला ब्रेक पाईप सिस्टम बसवण्याचा इशारा करत आहे.याचाच अर्थ रेल्वे चालक इंजिनचा ताबा घेण्यासाठी गार्डला इशारा करत आहे.हा हॉर्न चालक गार्डला इंजिनचा ताबा घेण्यास संकेत देत आहे. जेव्हा एखाद्याने रेल्वेची आपत्कालीन साखळी खेचली असेल किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला. जर चालकअधूनमधून जास्त हॉर्न वाजवत असेल, तर रेल्वे क्रॉसिंग ओलांडणार आहे. या हॉर्नमधून लोको पायलट ट्रॅकच्या आसपास उपस्थित लोकांना रेल्वे येत असल्याचा इशारा देतो. त्यामुळे त्याने दूर जावे. प्रवासादरम्यान हा हॉर्न ऐकला तर रेल्वेचा ट्रॅक बदलत आहे, हे समजून घ्या. सलग सहा वेळा छोटा हॉर्न चालक ट्रेन अडचणीत आल्यावरच वाजवतो. या माध्यमातून ती जवळच्या स्टेशनवर मदतीचे आवाहन करते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.