Jagannath Rath Yatra 2022: sakal
फोटोग्राफी

Jagannath Rath Yatra 2022: जगन्नाथाचे मंदिर बाराव्या शतकात कोणी बांधले?

जगन्नाथापुरी हे भारतातील चार धामांपैकी एक आणि ओरिसा राज्यातील पुरी जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण.

सकाळ डिजिटल टीम

जगन्नाथापुरी हे भारतातील चार धामांपैकी एक आणि ओरिसा राज्यातील पुरी जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. येथील जगन्नाथाच्या मंदिरामुळेच पुरीला विशेष महत्त्व आले आहे. हिंदूंच्या या पवित्र व प्रसिद्ध यात्रास्थानाचा उल्लेख श्रीक्षेत्र किंवा पुरुषोत्तम क्षेत्र म्हणूनही पुराणांत आला असून येथील जगन्नाथाचे मंदिर कलिंगचा राजा चोडगंगाने आणि अनंग भीमदेवाने सु. बाराव्या शतकात बांधले, असे मानले जाते.

हे मंदिर जगन्नाथाचे असले तरी येथे कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती असून त्यांस फक्त डोळे, नाक, तोंड एवढेच अवयव आहेत. त्या दर बारा वर्षांनी नवीन करतात. या मूर्तींविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. काही पाश्चात्त्य विद्वानांच्या मते या त्रिमूर्ती बौद्ध धर्मातील तीन तत्त्वे-बुद्ध, संघ, धर्म यांच्या सूचक आहेत. तसेच काहींच्या मते येथे पूर्वी बौद्ध स्तूप असण्याची शक्यता आहे.
हे मंदिर नीलाचल पर्वतावर असून मंदिराच्या महाद्वारी सु. ८ मी. उंचीचा काळ्या पाषाणाचा अरुणस्तंभ आहे. मंदिराभोवती सु. ६ मी. उंचीची संपूर्ण दगडी तटबंदी असून चारी दिशांस चार प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वार सिंहद्वार म्हणून ओळखले जाते. हेच महाद्वार होय. 
जगन्नाथ मंदिरात पंचामृताभिषेक, अग्निपूजा, महापूजा, महानैवेद्य, वस्त्रालंकारादी राजभोग इ. कार्यक्रम अहोरात्र चालू असतात.जगन्नाथाची रथयात्रा विशेष प्रसिद्ध असून ती आषाढ शु. द्वितीयेला सुरू होते. कृष्ण, बलराम आणि सुभद्रा या तिघांच्याही रथांची यात्रा असते. यात्रेसाठी भारतातून लाखांवर भाविक जमतात. या रथाखाली सापडून मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, अशी भाविकांची समजूत आहे. जगन्नाथाचा जड रथ हजारो लोक ओढून नेतात, यावरून पुष्कळ लोकांच्या श्रमांमुळेच पूर्ण होऊ शकणाऱ्या कामाविषयी ‘जगन्नाथाचा रथ’ असा वाक्‍प्रचार रूढ झाला.
फाल्गुन शुद्ध द्वादशीला गोविंद द्वादशी म्हणतात व तो जगन्नाथाचा जन्मदिवस मानतात. या तिथीला पुष्य नक्षत्र असल्यास पुरीला समुद्रस्नानासाठी मोठी यात्रा जमते. मार्कंडेय सरोवर, कृष्णवट, बलराम समुद्र, इंद्रद्युम्न कुंड ही येथील मुख्य तीर्थस्थाने होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT