Jawan Somnath Mandhare esakal
शहीद जवान सोमनाथ मांढरे यांच्या आसले गावातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता.
सातारा : हुतात्मा सोमनाथ मांढरे (Jawan Somnath Mandhare) यांच्या पार्थिवावर आज आसले (ता. वाई) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, माजी आमदार मदन भोसले, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण यांनी शहीद जवान सोमनाथ मांढरे यांना पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली.शहीद जवान सोमनाथ मांढरे यांच्या आसले गावातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. ‘अमर रहे, अमर रहे सोमनाथ मांढरे अमर रहे, भारत माता की जय,’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली. यावेळी पालकमंत्री पाटील, आमदार पाटील, अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी मांढरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर भाऊ राहूल, पत्नी प्रियंका, मुलगा यश व मुलगी आराध्या (वय 10 महिने) यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.शहीद सोमनाथ मांढरे यांचा मुलगा यश यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी-माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.