chandgad
chandgad esakal
फोटोग्राफी

किल्ले कलानंदिगडावरील बांधकामाचे नमुने जगासमोर; पहा PHOTO

सुनील कोंडुसकर

दूर्गवीर हीच त्यांची ओळख. याच एका नावाने ते एकत्र येतात. दर रविवारी घरातून भाजी-भाकरी घेऊन गड गाठतात. दिवसभर श्रमदान करतात. कोणाच्या हाताला फोड आले, जखमा झाल्या, कोणाची नखे तुटली, परंतु श्रमदान थांबले नाही. किल्ले कलानंदिगड (ता. चंदगड) येथे दूर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गेली सहा वर्षे श्रमदानाचा जागर मांडला आहे. त्यांच्या घामाच्या अभिषेकातून गडाची तटबंदी खुली झाली. मातीखाली गाडलेला शौचकूप, देवळी आणि गडावरील पाणी बाहेर जाण्यासाठी बांधलेले पाट खुले झाले. प्राचीन बांधकामाचे नमुने नव्याने जगासमोर मांडता आले याचेच या दूर्गवीरांना समाधान.

दूर्गवीर प्रतिष्ठानने गेल्या काही वर्षांपासून राज्यातल्या विविध ठिकाणी गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. छत्रपती शिवरायांच्या ठायी अनन्य निष्ठा आणि श्रमदानावर विश्‍वास या जोरावर दूर्गवीरांचे काम चालते. कलानंदिगड हा चंदगड तालुक्याच्या दक्षिणेला वसलेला अत्यंत देखणा गड.
सहा वर्षांपूर्वी दूर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे तिकडे लक्ष गेले. चंदगड तालुक्यातील आणि सीमाभागातील अनेक दूर्गवीर गडाच्या संवर्धन मोहिमेत गुंतले. दर रविवारी किमान पंचवीस ते पन्नास तरुण यासाठी घामाचा अभिषेक वाहतात.
सुरवातीच्या टप्प्यात गडाच्या स्वच्छतेला महत्त्व दिले गेले. गडाचा इतिहास जाणून घेत त्याचे माहिती फलक, दिशादर्शक फलक उभारले गेले. त्यानंतर गतवर्षी १ जानेवारीला त्यांनी गणेश दरवाजाजवळीत ढासळलेल्या तटबंदीच्या संवर्धनाचे काम हाती घेतले. या वर्षी ३० जानेवारीला ते पूर्ण केले.
भिंतीमध्ये पणती लावण्यासाठी केलेली देवळी स्वच्छ केली. पावसाचे पाणी तटबंदीतून बाहेर जाण्यासाठी बांधलेले पाट स्वच्छ केले. चौकी खुली केली. तटबंदीवर चढण्यासाठीच्या नऊ पायऱ्या जमिनीत गाडल्या गेल्या होत्या, त्या बाहेर काढल्या. अत्यंत संवेदनशीलपणे त्यांनी हे काम केले.
लहान मुलाला जसे सांभाळतो तशाच पध्दतीने आम्ही या दगडांची हाताळणी केली असे दूर्गवीर संदीप गावडे व अभिजित अष्टेकर सांगतात त्यावेळी त्यांच्या मनातील गडाविषयीची श्रध्दा स्पष्ट होते. दूर्गसंवर्धनाचे काम हे यंत्रापेक्षा माणसांनीच का करावे याचे हे उत्तम उदाहरण मानावे लागेल. कोणाकडेही मदत, देणगीची याचना न करता दूर्गवीर वर्गणी काढून हे काम करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT