Karhunnavi Festival News esakal
उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यातील अनेक गावांत मंगळवारी (ता. १४) कारहुन्नवी साजरा करण्यात आला. दरम्यान गेल्या दोन-अडीच वर्षात कोरोनाचे सावट असल्याने सण, उत्सव उत्साहात साजरे करणे शक्य नव्हते. मात्र आता उत्साह वाढला आहे. शेतकरी बांधव कर्नाटकी बेंदूर (कारहुन्नवी) सण मोठ्या उत्साहात साजरा करतो.
प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि तिथी बदलत असल्याचे पाहायला मिळते. कृषी संस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी येतात.
प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि तिथी बदलत असल्याचे पाहायला मिळते. कृषी संस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी येतात.मल्लखांब कसरती कदेर ग्रामस्थांनी कारहुन्नवी सणाची परंपरा जपली आहे. प्रारंभी सकाळी बैलजोड्यांना आणून मारूती मंदिरात नारळ फोडण्यात आले. सायंकाळी चार वाजता गावातील मुख्य मार्गावरून बैलाची (सर्जा राजा) ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.कदेर ग्रामस्थांनी कारहुन्नवी सणाची परंपरा जपली आहे. प्रारंभी सकाळी बैलजोड्यांना आणून मारूती मंदिरात नारळ फोडण्यात आले. सायंकाळी चार वाजता गावातील मुख्य मार्गावरून बैलाची (सर्जा राजा) ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.उमरगा शहरातील काही भाग तसेच कसगी, कदेर, गुंजोटी, भूसणी, जकेकुर, कोळसूर (गुंजोटी), मळगी, मळगीवाडी, कोथळी, कंटेकुर, मुरुम, भुयारचिंचोली, येणेगूर, भोसगा तर कर्नाटक सीमेजवळील उजळंब, एकंबा, आणुर, गदलेगाव, रामतीर्थ, लाडवंती आदी गावात कारहुन्नवी साजरी झाली.बैलांची खांदे मळणी, गाय-बैलांना आंघोळ, शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल आणि विधीवत पुजन करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण. आणि बैलजोड्यांची ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.