Rinku Singh
Rinku Singh  esakal
फोटोग्राफी

क्रिकेटसाठी बापाचा मार खाल्ला, पण पहिल्या IPL कमाईतून गिफ्ट दिली कार

धनश्री ओतारी

यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी कोलकाता नाइट रायडर्स ही तिसरी टीम आहे. लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्ध झालेल्या पराभवानंतर कोलकाताची टीमही प्लेऑफ गाठू शकणार नाहीये. मात्र या सामन्यात केकेआरचा खेळाडू रिंकू सिंहची चर्चा जोरदार रंगली आहे. त्याने त्याच्या आयपीएलच्या पहिल्या कमाईतून वडिलांना कार गिफ्ट केली.

उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये रिंकू सिंहचा जन्म झाला. क्रिकेपटू बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास खडतर होता. पाज भावंडांमध्ये रिंकू तिसरा आहे. त्याचे वडील गॅस सिलिंडर पोहचवण्याचं काम करायचे. कुटुंबाची अर्थिक स्थिती बेताची असल्याने क्रिकेटर बनण्याच स्वप्न साकार करण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.
रिंकून मैदानात पाऊल ठेवण्यापूर्वी रिंकूने झाडू मारण्याची नोकरी केली आहे. ऑटो रिक्षा सुद्धा चालवली आहे. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटूंबातून तो पुढे आला आहे.
24 वर्षीय रिंकू सिंहनं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न पूर्ण करता येते हे दाखवून दिले.
बॉल खरेदी करण्यासाठी पैसे नसणाऱ्या रिंकून क्रिकेटची मैदाने गाजवायला सुरुवात केली. एका स्पर्धेत त्याला चांगल्या कामगिरीमुळे बाइक बक्षीस स्वरुपात मिळाली. त्याने ही कार आपल्या वडिलांना गिफ्ट दिली.
विशेष म्हणजे पाच भावंडातील रिंकूला क्रिकेटची आवड होती. मात्र त्याच्या वडीलांना क्रिकेट आवडत नव्हेत. क्रिकेट खेळायला गेल्यामुळे त्यानं वडिलांचा मारही खाल्ला. भावांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तो क्रिकेटमध्ये तरला.
लखनऊविरुद्ध झालेल्या सामन्यात रिंकू सिंगने 15 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी खेळली आणि या खेळीत त्याने 2 चौकार आणि 4 सिक्स मारले. मेगा लिलावात कोलकाताने त्याला 55 लाख रुपयांत खरेदी केलं होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT