kl rahul reaches germany for persistent groin injury treatment
kl rahul reaches germany for persistent groin injury treatment 
फोटोग्राफी

KL राहूल उपचारासाठी जर्मनीत दाखल - पाहा फोटो

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल उपचारासाठी जर्मनीला पोहोचला आहे. राहुल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत खेळू शकणार नाही. टीम इंडिया सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्याला यजमान संघाविरुद्ध 1 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत.

केएल राहुल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. राहुल आता उपचारासाठी जर्मनीला गेला आहे. राहुलने त्याच्या सोशल मीडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ही माहिती दिली.
३० वर्षीय केएल राहुलचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. दुखापतीमुळे राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत कर्णधार होऊ शकला नाही.
आयपीएलच्या 15 व्या हंगामामध्ये त्याला उजव्या हाताला दुखापत झाली होती, परंतु तेव्हा हे प्रकरण इतके गंभीर झाले नव्हते. तो कर्णधार म्हणून आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत राहिला.
केएल राहुल जवळपास एक महिना जर्मनीमध्ये राहणार आहे. तो आता भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात निवडीसाठी उपलब्ध होऊ शकतो. बीसीसीआयने यापूर्वीच जर्मनीतील उपचारांची माहिती दिली होती.

इंग्लंड दौऱ्यासाठी केएल राहुलला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आलं होतं, मात्र आता त्याच्या जागी ऋषभ पंत जबाबदारी स्वीकारणार आहे.

राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही कर्णधारपद भूषवणार होता, पण मालिका सुरू होण्यापूर्वी दोन दुखापतींमुळे तो बाहेर पडला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT