तुम्ही मिल्की वे गॅलेक्सि (Milky Way Galaxy) हे नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. गॅलेक्सि म्हणजेच आकाशगंगा. सूर्य, पृथ्वी आणि इतर सर्व ग्रह याच आकाशगंगेत आहेत. मात्र आपण असलेल्या या आकाशगंगेला Milky Way Galaxy असं का म्हणतात? हे तुम्हाला माहिती आहे का? या आकाशगंगेशी निगडित काही तथ्य आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Know some interesting Facts about Milky Way Galaxy)
ग्रीक लोकांच्या समजुतीनुसार, देवी हेरा हर्क्युलिस यांना स्तनपान करत होत्या. ज्यावेळी त्यांनी स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काही दूध स्वर्गात खाली पडलं. यामुळेच आकाशगंगा निर्माण झाली. म्हणूनच या आकाशगंगेला मिल्की वे गॅलेक्सि म्हणतात. आकाशगंगेत असलेल्या एकूण ताऱ्यांपैकी आपल्याला जास्तीत जास्त ४ ते ५ हजार तारे दिसतात. मात्र काही वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे आकाशगंगेत कमीत कमी १००० ते २००० कोटी तारे आहेत. या ताऱ्यांना आपण डोळ्यांनी बघूही शकत नाही. Milky Way Galaxy ही आकाशगंगा कमीतकमी १ लाख लाईट इयर्सची आहे. १ लाईट इयर म्हणजे एका वर्षात प्रकाशानं पार केलेलं अंतर. म्हणजेच एका आकाशगंगेतून दुसऱ्या आकाशगंगेत जाण्यासाठी कमीतकमी १ लाख वर्ष लागतील. Milky Way Galaxy हे चक्राकार आकाराची आहे. तसंच या आकाशगंगेच्या मध्यभागी ब्लॅक होल आहे. ज्याचं मास (वजन) सूर्याच्या ४० लाख पट अधिक आहे. आपली सोलर सिस्टम Milky Way Galaxyच्या मध्यभागापासून कमीतकमी ३ लाख लाईट इयर्स दूर आहे. म्हणजेच तिथे पोहोचण्यासाठी कमीतकमी १ लाख वर्ष लागतील. आकाशगंगेतील सर्वात जुने तारे ग्लोब्युलर स्टार क्लस्टर नावाच्या गटांमध्ये आहेत. आकाशगंगेभोवती यातील जवळपास १५० क्लस्टर्स आहेत आणि ते १३ अब्ज वर्षांपर्यंतचे असू शकतात. (Know some interesting Facts about Milky Way Galaxy)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.