Yash esakal
फोटोग्राफी

KGF स्टार यशची लाईफस्टाईल पाहिलीत का?

धनश्री ओतारी

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचे लाखो चाहते आहेत. त्याच्या 'KGF' चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. यशचे खरे नाव नवीन कुमार गोवडा असे आहे. यश हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता म्हणुन ओळखला जातो. यश त्याच्या एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतो. गेल्या 10 वर्षांपासून ते फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. पण त्याला KGF या चित्रपटातून खरी ओळख मिळाली.

करिअरच्या सुरुवातीला यशने कन्नड मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने २००७मध्ये 'jambaba Hudugi' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशची एकूण मालमत्ता ₹ 53000000 आहे आणि 2021 मध्ये KGF च्या यशानंतर, यश त्याची पत्नी राधिका पंडित आणि दोन मुलांसह बंगलोरमध्ये एका नवीन डुप्लेक्स फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला. त्याची किंमत ₹ 5000000 आहे.
यशला महागड्या गाड्यांचे वेड आहे. त्याच्याकडे ऑडी क्यू ७ ही गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास १ कोटी रुपये आहे. तसेच त्याच्याकडे ८० लाख रुपये किंमत असलेली रेंज रोवर ही गाडी देखील आहे.
त्याचे वडिल अरुण कुमार हे बस ड्रायव्हर आहेत. यशच्या वडिलांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांनी ड्रायविंग करुन मिळणाऱ्या पैशामध्ये यशला लहानाचे मोठे केले आणि त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली.
यशने अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केले आहे. त्यांना दोन मुले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT