rain  google
फोटोग्राफी

पुढील तीन तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुढील तीन तासांत पाऊस पडणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा कडाका तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे आता वातावरणातील बदलांना वेग आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने सुरुवात केली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुढील तीन तासांत पाऊस पडणार आहे. राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात हा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. हा पाऊस पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या प्रदेशात कोसळणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या वादळी प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. दक्षिण भारतातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.
पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यातील तुरळक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची तसेच सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यातील पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या प्रदेशात पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही प्रदेशात पुढील तीन तासांत पाऊस पडणार आहे.
पुढील तीन तासांत या भागत पाऊस होणार आहे. मात्र घाबरुन जाण्याचे कारण नसून नागरिकांना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT