Bihu Celebration In Guwahati In Asam esakal
देशात आज मकरसंक्रांत, बिहू आणि पोंगल सण उत्साहात साजरा केला जात आहे. लवकर उठून बऱ्याच जणांनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. काहींनी घाटावर जाऊन नदीत स्नान केले.
तामिळनाडू - त्रिचीमध्ये लोकांनी पोंगल सण साजरा करायला सुरुवात केलीय.तेलंगना - तेलंगनाचे राज्यपाल तथा पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल तमिळसाई सुंदरराजन यांनी चेन्नई येथील आपल्या निवासस्थानी पोंगल साजरा केला. कोरोना नियमांचे पालन करुन सर्वांनी पोंगल सण सुरक्षिततेने साजरा करावा, असे आवाहन सुंदरराजन यांनी केले. उत्तर प्रदेश - भाविकांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगममध्ये मकारसंक्रांतीनिमित्त भाविकांनी पवित्र स्नान केले.कोरोना संसर्ग लक्षात घेता घाटावर पोलिस तैनात करण्यात आले आहे.त्यामुळे कोरोना नियम पाळले जात असल्याचे मेलाचे पोलिस अधीक्षक राजीव नरैन मिश्रा यांनी सांगितले. आसाम - आसामवासीयांनी मेज दहन केले. पारंपरिक नृत्य करुन नेहरुबली येथे मेघबिहू सण साजरा केला. आसाम - लोकांनी गुवाहाटीत मेज दहन केले.हा बिहू सणाचा एक भाग आहे. लागवडीचा हंगाम संपल्याने हा सण साजरा केला जातो. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.