१९ वर्षांच्या संसारानंतर अभिनेत्री मलायकाने अरबाज खानला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर अरबाज आणि मलायका यांच्यात मैत्रीपूर्ण नातं असून मलायका आता अर्जुनला डेट करत आहे. घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं होतं, याविषयी मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वाँट' या रेडिओ शोमध्ये मलायकाने याचा खुलासा केला. घटस्फोटाच्या आदल्या रात्रीदेखील कुटुंबीयांना मलायकाला पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला होता. 'तू घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम आहेस का', असा प्रश्न तिला पुन्हा एकदा विचारण्यात आला होता.
जवळच्या व्यक्तींकडून सतत हे ऐकणं खूप कठीण असतं, असं मलायका म्हणाली होती. मलायकाने तिच्या निर्णयाबाबत ठाम असल्याचं सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तिला पाठिंबा दिला. 'आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू खंबीर स्त्री आहेस', असं म्हणत कुटुंबीयांनी तिला साथ दिलीमलायका आणि अरबाजने घटस्फोट घेतला तेव्हा त्यांचा मुलगा अरहान हा १६ वर्षांचा होता. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत असून या दोघांनी माध्यमांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. वयाने खूप लहान असलेल्या अर्जुनशी अफेअर केल्याने मलायकावर टीकासुद्धा झाली होती. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.