मन झालं बाजींद या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. कृष्णा आणि रायाची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत आहे. पण कृष्णासमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे.
या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं की कृष्णाला शॉक लागून तिची शुद्ध हरपते. राया तिला हॉस्पिटलला घेऊन जातो पण रायाला डॉक्टर सांगतात, कृष्णा वाचण्याची शक्यता कमी आहे. रायाला हे ऐकून धक्का बसतो. राया कृष्णाला वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न सुरू करतो. कृष्णाचा जीव वाचतो पण शरीराला जबरदस्त शॉक बसल्याने तिचा उजवा हात निकामी होतो. उजव्या हाताच्या संवेदनाच निघून जातात. त्यामुळे कृष्णाला सीएची परीक्षा देता येणार नाही असा पेच निर्माण होतो. पण राया कृष्णाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो.या सर्व घटनांनंतर कृष्णा आणि राया यांचा लग्नानंतरचा पहिला मकरसंक्रातीचा सण येणार आहे. कृष्णाच्या हाताला संवेदना नसल्यामुळे कृष्णाची पतंग उडवण्याची इच्छा पूर्ण होणार का, कृष्णाला हळदीकुंकू समारंभात भाग घेता येणार का, कृष्णासमोरच्या या आव्हानाला ती कशी सामोरी जाणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.