Green Tea
Green Tea Green Tea
फोटोग्राफी

ग्रीन टी पिण्याचा योग्य वेळ कोणती?

भूषण श्रीखंडे
सकाळी झोपेतून उठले की, गरमागरम चहा घ्यावा, ही अनेकांची सवय असते.
ग्रीन टी मध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे शरीराला उर्जा मिळते, मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते आणि नवे काम करण्यासाठी उत्साह येतो.
ग्रीन टी मध्ये एल थॅनिन हे ॲमिनो ॲसिड असते. यामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होते.
कॅफिन आणि थॅनिन यांचा एकत्रित परिणाम होऊन मेंदूचे कार्यही सुधारते आणि मुड खराब होण्याचा त्रास कमी होतो.
धावणे, पळणे, सायकलिंग किंवा जीम असा व्यायाम केला की अनेक जण ग्रीन टी घेण्यास उत्सूक असतात. पण असे करणे टाळा. कारण याविषयी झालेल्या एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे.
ग्रीन टी व्यायामाला सुरूवात करण्यापुर्वी घेतला तर त्यामुळे शरिरातील फॅट बर्न होण्याचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढते. व्यायामाला सुरूवात करण्याच्या दोन तास आधी ग्रीन टी घेतलेला असावा.
व्यायाम करण्यापुर्वी जर ग्रीन टी घेतला असेल तर खूप हेवी वर्कआऊट केल्यानंतर शरीराच्या स्नायूंचे होणारे नुकसान भरून काढण्याची ताकदही ग्रीन टीमध्ये असते.
जेवण झाल्यानंतर ग्रीन टी घेण्याची अनेकांची आवड आणि सवयही असते. पण ही सवय अत्यंत चुकीची आहे. ग्रीन टी मध्ये कॅफिन असते. जर जेवणानंतर ग्रीन टी घेतला तर आपण जी काही पोषकमुल्ये जेवणातून घेतली आहे, ती शरीरात बांधून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे ही पोषक मुल्ये रक्तात मिसळत नाहीत आणि त्याचा शरीराला फायदा होत नाही.
झोपण्यापुर्वीही ग्रीन टी घेतला तर यामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास उद्भवू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT