फोटोग्राफी

mpsc वाली मुले गोविंदा पथक जॉइन करणार ? इंटरनेटवर मिम्सचा पाऊस

धनश्री ओतारी

दहिहंडीच्या खेळात सहभागी खेळाडू अर्थात गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे.

दहिहंडीचा आता क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच, खेळात सहभागी खेळाडू अर्थात गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये गोविंदांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण असेल अशी घोषणा केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या घोषणेनंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. त्यानंतर काही मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात MPSC वाली मुले गोविंदा पथक जॉइन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हायरल होणाऱ्या मीम्समध्ये गोट्या खेळणाऱ्या पोरांना नोकरीत २ टक्के आरक्षण मिळणार अशी न्यूज ब्रेक करण्यात येत आहे.
तर एका मीम्समध्ये सुरपारंबी खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा अशी मुख्यमंत्री घोषणा केली असल्याचे म्हटले आहे.
सरकारी नोकरी मिळण्यासाठी दोनच मार्ग, स्पर्धा परिक्षांची तयारी करणे किंवा गोविंदा पथक जॉईन करणे.
इतर खेळांप्रमाणं या गोविंदांदेखील शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के कोट्याचा लाभ घेता येईल. तसेच इतर सुविधांचाही लाभ घेता येईल, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT