Dangerous Places: be alert esakal
फोटोग्राफी

Dangerous Places: 'ही' आहेत जगातील सगळ्यात धोकादायक स्थळे, जाण्याआधी शंभर वेळा विचार कराल

ही जगातील अशी ठिकाणे आहेत जी जगातील सगळ्यात धोकादायक ठिकाणे मानली जातात.

सकाळ डिजिटल टीम

अनेक लोक पर्यावरण प्रेमी असतात. त्यामुळे त्यांना बऱ्याच नैसर्गिक ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडतं. तर काही लोकांना युनिक ठिकाणी जायला आवडतं, जिथे सहसा कोणी जात नाहीत. मात्र अशा ठिकाणी जाणं अनेकांना महागात पडू शकतं. जगात काही अशी पर्यटन स्थळे आहेत जी फारच धोकादायक आहे. शक्यतो कमकुवत मनाच्या आणि भितऱ्या लोकांनी अशा ठिकाणी अजिबात जाऊ नये.

हवाई द्वीपसमूहातील जिवंत ज्वालामुखी,यूसए (Volcano Tours in Hawaii, USA) - संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या पॅसिफिक महासागराच्या मध्यात एक प्रांत आहे. जगातील सगळ्यात धोकादायक स्थळांमध्ये या ठिकाणाचा समावेश होतो. जगातील ही एकमेव जागा आहे जिथे लोक जवळून ज्वालामुखी बघू शकतात. याला 'मौना लोवा' (Mauna Loa)असं म्हणतात. या ठिकाणामधून ज्वालामुखीच्या नद्या वाहताना दिसतात. अनेकांनी या ठिकाणी समुद्राच्या पाण्यात आग लागल्याची सुचनाही दिली आहे. त्यामुळे अनेक लोक इथे जाण्यास घाबरतात.
डेथ वॅली नॅशनल पार्क,यूएसए (Death valley National Park) - डेथ वॅलीला जगातील सगळ्यात शानदार घाटींमध्ये एक मानलं जातं. हे ठिकाण नेवादा आणि कॅलिफोर्नियाच्या मधात येतं. या घाटाचं तापमान ५६.७ डिग्री एवढं असतं. मानल्या जातं की हेरी पोर्टर चित्रपटातील डेव लगेनोचा मृत्यू डेथ वॅलीमधील अतितापमानामुळेच झाला होता. येथील डोंगर एका जागेवरून दुसऱ्या जागी चालत जातात असं मानल्या जातं. या जागी अनेक रहस्य दडले आहेत असं मानलं जातं.
स्नेक आयलँड(Snake Island, Brazil) - ब्राजीलमधील स्नेक आयलँड हे जगातील सगळ्यात धोकादायक ठिकाणांमध्ये मानलं जातं. ब्राजीलच्या साओ पावलो शहराजवळ असणाऱ्या या द्वीपमध्ये सर्वात जास्त प्रजातींच्या सापांना बघितल्या जातं. मानलं जातं की यातील साप एवढे विषारी असतात की माणसांना शरीराला जागीच वितळवण्याची ताकद यांच्यात असते. जगातील सगळ्यात विषारी साप ब्रोथोप्स इथेच बघितल्या जातो. पर्यटकांसाठी हे ठिकाण अत्यंत धोकादायक असल्याने यावर शासनाने बंदी घातली आहे.
ओम्याकोन रूस - (Oymyakon, Siberia) भारत वगळता पर्यटक जेव्हा विदेशात फिरायला जातात तेव्हा वातावरण थंड असतं. पण तुम्हाला माहितीये, जगातील सगळ्यातं थंड शहर कुठलं आहे ते? ओम्याकोन हे जगातील सगळ्यात थंड शहर आहे. पहिल्यांदा कुठला व्यक्ती फिरायला गेल्यास त्यांची हाडे थंडीने गोठू शकतात.
डानाकिल डेजर्ट, इथोपिया - डानाकिल डेजर्ट हे जगातील सगळ्यात उष्ण ठिकाण मानल्या जातं. आफ्रिकेतील इथोपियाचं डानाकिल डेजर्ट जगातील सगळ्यात शुष्क आणि खालच्या भागातील स्थळ. इथे गेल्यास तुम्हाला दुसऱ्या ग्रहावर गेल्यासारखं वाटतं. या ठिकाणी तुम्हाला सल्फरचे डोंगर आणि नद्या बघायला मिळतील. इथे एका महिलेचा सापडा सापडला होता. ज्याला ३.२ मिलियन वर्ष जुनं सांगितल्या जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT