पारिजात मुंबई संस्था Sakal media
फोटोग्राफी

इंद्रधनुषी शाळा - पारिजात मुंबई संस्थेचा अनोखा उपक्रम

जिल्हा परिषद शाळेमध्ये केली रंगाची उधळण

अमोल सांबरे
पारिजात संस्था मुंबई गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवत आहे, बॅक टू स्कूल, इंद्रधनुषी शाळा हे उपक्रम महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये राबवत आहे, इंद्रधनुषी शाळा हा उपक्रम फक्त रविवारी राबवला जातो, या उपक्रमांतर्गत विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काचरपाडा या ठिकाणी संपूर्ण शाळा रंगरंगोटी व विविध शैक्षणिक चित्र काढून इंद्रधनुष्यातील रंगांची उधळण करून आणि संपूर्ण शाळेचे रूप पालटले.
शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे. पालघर जिल्यातील ही पहिलीच शाळा असून या कार्यक्रमासाठी संस्थेचे स्वप्नील पाथरे, गुरुदास बाटे, राहुल शिंदे,हर्षद ठाकरे, धनंजय जाधव या कलाकारांसहित 40 सदस्यांची टीमने हा उपक्रम राबवला.
विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काचरपाडा या ठिकाणी संपूर्ण शाळा रंगरंगोटी व विविध शैक्षणिक चित्र काढून इंद्रधनुष्यातील रंगांची उधळण करून आणि संपूर्ण शाळेचे रूप पालटले, शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे.
पालघर जिल्यातील ही पहिलीच शाळा असून या कार्यक्रमासाठी संस्थेचे स्वप्नील पाथरे, गुरुदास बाटे, राहुल शिंदे,हर्षद ठाकरे, धनंजय जाधव या कलाकारांसहित 40 सदस्यांची टीमने हा उपक्रम राबवला. या उपक्रमानंतर शाळेतील शैक्षणिक वातावरण बदल होण्यास व शाळा शुशोभीकरणास नक्कीच मदत होणार असल्याचे शाळेचे शिक्षक यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ, तरुण मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT