mushroom growing in farm  
फोटोग्राफी

PHOTO : रानात उगवणारी अळंबी बनतेय रोजगाराचं साधन

स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या विक्रीतून रोजगाराचा मार्ग शोधला असून ते आर्थिक उत्पन्नाचे साधन ठरत आहे.

सचिन माळी.

मंडणगड : ऊन-पाऊस होत असल्याने दोन दिवसांपासून रानात डोंगरमाथ्यावर, झाडाझुडपातून अळंबीची उगवण झाली आहे. पहाटे त्यांचा शोध घेऊन आदिवासी व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या विक्रीतून रोजगाराचा मार्ग शोधला असून ते आर्थिक उत्पन्नाचे साधन ठरत आहे.

नैसर्गिक उत्पादित होणाऱ्या अळंबी व रानभाज्या या चविष्ट आणि स्वादिष्ट असल्याने त्याला शहरात मोठी मागणी असून त्यांच्या विक्रीतून आर्थिक लाभ मिळतो आहे.मोठा पाऊस झाला की, रानात अळंबी जमिनीतून वर उगवते. ती शोधून काढणे कसबीचे काम असते.
या वेळी पावसाचा जोर ओसरल्याने अळंबी फुटली नाही; मात्र दोन दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अळंबीची उगवण झाली आहे. तालुक्यात रोजगाराच्यानिमित्ताने आदिवासी समाजातील अनेक कुटुंबे रानातील डोंगर पठारावर झोपड्या बांधून राहत आहेत.
पहाटे लवकर जंगलात जाऊन त्याचा शोध घेण्यात येतो. गवताचे प्रमाण व उंची वाढल्याने त्यातून अळंबीच्या कळ्या शोधून काढाव्या लागत आहेत; मात्र माहितगार बरोबर शोध घेऊन त्या काढून घेत आहेत. स्थानिक शेतकरीही या कामी पुढे आहेत.
दोन तासांत टोपलीभर अळंबी जमा करून त्याची मुख्य रस्त्याशेजारी, शहरातील बाजारपेठेत विक्री करण्यात येत आहे तसेच तालुक्यातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी अळंबी विक्री होताना दिसून येत आहे.
100 ते 150 रूपयांना वाटा लावून आदिवासी महिला त्याची विक्री करताना दिसून येत आहेत. मंडणगड बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अळंबीची विक्री होत असून खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे.
तास दोन तासात आणलेल्या अळंबीची विक्री होऊन त्यातून हजार ते दीड हजार रूपयांचे उत्पन्न पदरी पडत आहे. रानात उगवणाऱ्या नैसर्गिक भाज्यांना चांगली मागणी असून नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.
भारगी, टाकला, कालेरी, धांडगी, पोकला, मयाळू, तेरी, काटल अशा पावसातील रानटी भाज्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे खवय्यांना विविध भाज्यांचा स्वाद चाखायला मिळतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT