राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी महानगरपालिकेसमोर चक्का जाम आंदोलन केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी महानगरपालिकेसमोर चक्का जाम आंदोलन केलं आहे. महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपवर करत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे, मंगलाताई कदम, विरोधी पक्षेनेते राजू मिसाळ, योगेश बहल आणि इतर नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत. पिंपरीत सत्ताधारी भाजपने जनतेचा विश्वासघात करून करदात्या जनतेची लूट केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले आहे. स्मार्ट सिटीसह इतर कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. चिंचवड स्टेशन ते पिंपरी चौक, महानगरपालिका असा पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.चले जाव भ्रष्टाचारी भाजपा चले जाव अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.