फोटोग्राफी

PHOTO : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

राजकीय क्षेत्रातील इतर क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपाचारावेळीच त्यांची प्राणज्योत मालवली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहास होते. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती येथील निवास स्थानी आणले असून नागरिकांची अंत्यदर्शनासाठी गर्दी होत आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली आहे.

बाबासाहेब पुरंदरेंचे निधन झाल्याची बातमी कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याकडे येण्यासाठी रवाना झाले होते.
राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अंतिम दर्शन घेतले.
बाबासाहेबांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी, काम, लिखाण, साहित्य अनेक पिढ्यांसाठी जिवंत राहिल अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.
पर्वती पायथा निवासस्थानी 8 ते 12 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अनेकजण श्रद्धांजली वाहण्यासाठी येत आहेत.
12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती येथील निवास स्थानी आणले असून नागरिकांची अंत्यदर्शनासाठी गर्दी होत आहे.
यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले. निवासस्थान परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT