काजू  
फोटोग्राफी

गर्भावस्थेत काजू खाण्याचे फायदे; 'या' आजरांपासून मिळेल संरक्षण

सकाळ वृत्तसेवा

गर्भावस्थेत काजू खाणे सुरक्षित आहे का असे कुणी विचारले तर बरीच उत्तर मिळतात. यात मग होय किंवा नाही असे शाब्दिक युद्धही सुरु होते. बऱ्याचवेळा खावे असे उत्तर मिळते. कारण बऱ्याच संशोधनानुसार आणि अभ्यासानुसार गर्भावस्थेच्या दिवसांत काजू खाणे सुरक्षित आहे. यामुळे या दिवसांत होणाऱ्या काही आजरांचा तुम्ही सामना करणे सोपे होते. किंवा त्यापासून सुरक्षितता मिळते. ब्रेकफास्ट वेळी खाणे खूप फायदेशीर आहे आणि यामुळे पचन सुधारते. आपण सकाळी रिकाम्या पोटी मनुका, बदाम आणि पिस्ता खाऊ शकता, मात्र त्याच्या प्रमाणांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

बर्थ डिफेक्टपासून संरक्षण काजूमध्ये फोलिक आम्लाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे बाळाचे बर्थ डिफेक्टपासून संरक्षण करते.
ब्लडशुगरची पातळी मेंटेन ठेवा एका वैज्ञानिक अभ्यासानुसार गर्भावस्थेत काजू खाणे उत्तम असते. गर्भावस्थेत काजू शरीरातील ब्लडशुगरची पातळी मेंटेन करण्यास मदत होते.
भ्रूण विकासासाठी मदत काजूमध्ये उपलब्ध असलेले जिंकचे प्रमाण हे भ्रूण विकासासाठी मदत करते. बाळला संरक्षित आणि तंदुरुस्त बनवते.
कब्ज दुर ठेवण्यासाठी मदत गर्भावस्थेत कब्जची समस्या हे होण्याची शक्यता अधिक असते, या दिवसात ही समस्या नॉर्मल आहे. मात्र यासाठी काजूची मदत होते. कारण त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कब्ज दूर करण्यासाठी ते मदत करतात.
आई आणि बाळासाठी उपयोगी यासह काजूमध्ये अनेक पौष्टिक घटक आणि तत्व असतात. हे पौष्टिक घटक आई आणि तिच्या पोटात वाढणारे बाळ दोघांनाही उपयोगी पडतात.
ओरल हेल्थसाठी काजूमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. गर्भावस्थेत याचा फायदा होतो. दातांसाठी आणि हिरड्यांसाठी हे उपयोगी पडते.
डोकेदुखी टाळण्यास मदत या दिवसांत नियमित काजू खाल्ल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. डोकेदुखीची समस्या यामुळे दूर राहते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT