फोटोग्राफी

Photo: राष्ट्रपतींना SPG, NSG सिक्युरिटी नसते मग कुठली सुरक्षा असते?

सकाळ डिजिटल टीम
भारतात राष्ट्रपतींना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) किंवा नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) सुरक्षा नसते. त्याचबरोबर झेड प्लस, झेड किंवा वाय सारख्या श्रेणींची सुरक्षा व्यवस्थाही नसते.
भारतातील राष्ट्रपतींच्या सुरक्षेत खास सुरक्षा रक्षक तैनात असतात, जे विशेष रक्षक असतात. त्यांच्या निवडीचे निकष एसपीजी किंवा एनएसजी सुरक्षा रक्षकापेक्षा कमी नसतात.
राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी प्रेसिडंट्स बॉडी गार्ड्स अर्थात पीजीबीकडे असते. या पीजीबीमध्ये अनेक अधिकारी, जवान तसेच भारतीय सैन्यातील पॅराशूट रेजिमेंटच्या स्पेशल फोर्स युनिटचा समावेश असतो.
राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे सुप्रीम कमांडर असतात. त्यामुळेच त्यांची सुरक्षा देखील खास असते. सध्याच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुरक्षा भारतीय लष्कराच्या सर्वात जुन्या रेजिमेंटकडं सोपवण्यात आली आहे.
प्रेसिडंट्स बॉडी गार्ड्समध्ये लष्करातील एका घोडदळाचाही समावेश असतो. राष्ट्रपती भवन आणि त्याच्या बाहेर राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी यांच्याकडे सुरक्षा प्रदान केलेली असते. यामध्ये केवळ जाट, शीख आणि राजपूत समुदायातील जवानांचाच समावेश असतो.
राष्ट्रपतींच्या एसबीजीमध्ये सुमारे १७० जवान, दीड डझन अधिकारी राष्ट्रपतींची सुरक्षा करतात. याशिवाय या जत्थ्यात सामिल चार अधिकाऱ्यांना प्रशासकीय सपोर्ट असतो. याशिवाय ११ ज्युनिअर कमिशंड अधिकारी देखील असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT