rahul deshpande shared post about eco friendly ganeshotsav 2022 he paints paper ganesh idol in pune sakal
फोटोग्राफी

Ganeshotsav 2022: राहुल देशपांडे लागले तयारीला, घडवला ईको फ्रेंडली बाप्पा

फोटो शेयर करत राहुल म्हणाले.. आपण सगळेच पर्यावरणाचे भान ठेवूयात..

नीलेश अडसूळ

Rahul deshpande : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत. थोड्याच दिवसात बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार असल्याने जो तो मूर्ती, सजावट, मखर अशा पूर्व . तयारीच्या गडबडीत आहे. यामध्ये कलाकारही मागे नाहीत. गणेशोत्सवात कलाकारांच्या घरच्या बाप्पाकडे सर्वांचेच लक्ष्य लागलेले असते. त्यामुळे तो कसा वेगळा होईल यासाठी कलाकार प्रयत्न करत असतात. गायक आणि अभिनेता राहुल देशपांडे सध्या गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. नुकतेच त्याने काही फोटो शेयर केले ज्यामध्ये तो मूर्ती रंगवताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याचे या माध्यमातून ईको फ्रेंडली गणेशोत्सव करण्याचा संदेश दिला आहे. (rahul deshpande shared post about eco friendly ganeshotsav 2022 he paints paper ganesh idol in pune)

पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' या इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमात राहुल देशपांडे सहभागी झाले होते.
यावेळी राहुल संपूर्ण कुटुंबासोबत मूर्ती रंगवण्यासाठी सहभागी झाले होते.
यावेळी त्यांच्या मुलगी रेणुका आणि पत्नी नेहा यांनी देखील छोटा बाप्पा रंगवून या उपक्रमाचा आनंद लुटला.
या उपक्रमाचे काही फोटो शेयर करून, राहुल देशपांडे यांनी पर्यावरण पूरक बाप्पा साजरी करण्याचा संदेश दिला आहे.
ते म्हणतात, 'शिवाजी नगर येथील पुणे हँडमेड पेपर्सच्या आवारात संपन्न झालेल्या उपक्रमात आज विद्यार्थ्यांसोबत कागदी बाप्पा स्वतः रंगवताना एक वेगळीच उर्जा जाणवली. या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती अनोख्या असून त्या ८०% कापूस-कागदाचा लगदा आणि २०% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केल्या जातात. महत्वाचे म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेला कागद हा वृक्षतोड करून तयार केलेला नसून, वापरलेल्या कागदाची गुणवत्ता सुधारुन म्हणजेच पेपर अपसायकल करून वापरला आहे. या मूर्ती वजनाने हलक्या असतात आणि जलरंगांनी रंगवता येतात अशी माहिती मला शोभना हडप आणि संजीव पवार यांनी दिली तेंव्हा आपण एका चांगल्या उपक्रमाचा भाग झालो याचा आनंद वाटला. यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना आपण सगळेच पर्यावरणाचे भान ठेवूयात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yellow Rain Kolhapur : काय सांगता! कोल्हापूरच्या कागल परिसरात चक्क पिवळा पाऊस, सोशल मीडियावर Video Viral

AUS vs IND, 3rd ODI: भारताच्या Playing-XI मध्ये कुलदीप यादवला संधी, पण नितीश रेड्डीच्या न खेळण्याचं खरं काय कारण? BCCI कडून खुलासा

Whatsapp Storage Feature : स्टोरेज सतत फूल होतंय? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर; एका क्लिकमध्ये मॅनेज करता येणार मोबाईलचा स्पेस

Healthy Life: फक्त सकाळी जिम अन् डाएट करणे पुरेसे नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते 'या' गोष्टींही ठेवल्या पाहिजे लक्षात

दारूच्या ठेक्यावर कारवाई करायला पोलीस गेले, प्यायला गेलेल्यानं कार वेगात पळवली; ५ जणांचा चिरडून मृत्यू, अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT