हिंदी, मराठी, तमिळ, कन्नड चित्रपटांत रेल्वेचा प्रवास किंवा रेल्वे स्थानकांचं दृश्य अनेकदा पाहायला मिळतं. आतापर्यंत अनेक चित्रपटांत ट्रेन दिसलीय, यामुळं चित्रपटाचं सौंदर्य देखील वाढतं.
हिंदी, मराठी, तमिळ, कन्नड चित्रपटांत रेल्वेचा प्रवास किंवा रेल्वे स्थानकांचं दृश्य अनेकदा पाहायला मिळतं. आतापर्यंत अनेक चित्रपटांत ट्रेन दिसलीय, यामुळं चित्रपटाचं सौंदर्य देखील वाढतं. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का, की ट्रेन किंवा स्टेशनवर शूटिंगसाठी रेल्वे काय भाडं आकारते?कदाचित, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. मात्र, आम्ही तुम्हाला सांगू.. शूटिंगसाठी रेल्वे प्रशासन निर्मात्यांकडून पैसे घेत असते. चला तर मग जाणून घेऊया, रेल्वे प्रशासन किती पैसे घेते.जुन्या काळापासून गाड्या चित्रपटांमध्ये वापरल्या जात आहेत. आपण दशकांपूर्वीचे किंवा आजच्या काळातील चित्रपट पाहिले तर आपल्या लक्षात येईल. ट्रेनची दृश्ये चित्रपटांमध्ये अनेकदा पाहायला मिळतात. चित्रपटांशी संबंधित अनेक कलाकार ट्रेनमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, हा प्रवास निर्मात्यांसाठी खूपच महागडा आहे. यासाठी रेल्वे लाखो रुपयांपर्यंत शुल्क आकारते.समजा, एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी निर्मात्यांना रेल्वेचं एक इंजिन आणि चार बोगी हव्या असतील, तर त्यासाठी त्यांना फक्त एका दिवसासाठी रेल्वेला सुमारे ५० लाख रुपये द्यावे लागतील. रेल्वेचा खर्च उचलणं सर्वांच्याच हातात नाही, यात शंका नाही. मात्र, 50 लाख हे फक्त एका दिवसाचं शुल्क आहे. तेही ट्रेनचे एक इंजिन आणि चार बोगी.मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगसाठी गुड्स ट्रेनचा वापर केल्यास, निर्मात्यांना रेल्वेला किमान 200 किमीचे शुल्क द्यावं लागतं. यात एक आश्चर्यकारक गोष्ट अशी, की शुटिंगसाठी केवळ एक किलोमीटरचा वापर केला, तरी शुल्क भरावंच लागतं. म्हणजेच, रेल्वे दररोज 426600 दरानं शुल्क आकारते.चित्रपट, वेब सीरिज किंवा कोणत्याही मालिकेच्या शूटिंगदरम्यान ट्रेन थांबवली तर त्यासाठीही फी भरावी लागते. त्यासाठी 900 रुपये प्रति तास या दरानं जादा शुल्क आकारलं जात असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रेनच्या नावावर अनेक चित्रपट बनले आहेत. उदाहरणार्थ राजेश खन्ना यांचा 'द ट्रेन' आणि धर्मेंद्र, विनोद खन्ना, जितेंद्र, हेमा मालिनी, नीतू कपूर आणि परवीन बाॅबी यांचा 'द बर्निंग ट्रेन'.चित्रपटांचं शूटिंग लक्षात घेऊन रेल्वेनं स्थानकांची तीन श्रेणींत विभागणी केलीय. ज्यात ए वन वर्गात दररोज एक लाख रुपये, बी वन आणि बी दोन वर्ग स्टेशनसाठी प्रतिदिन 50 हजार रुपये शुल्क आहे.चित्रपटांत दाखवण्यात आलेले रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनचा काही भाग वास्तविक रेल्वे स्थानकाशिवाय फिल्मसिटीमध्ये तयार करण्यात आलेल्या कृत्रिम स्टेशनमध्ये शूट केला जातो.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.