Raj Thackeray Sakal
फोटोग्राफी

राज ठाकरेंचा नवा अंदाज महाराष्ट्राला भावणार का?

उत्तरसभेच्या भाषणात राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.

सकाळ डिजिटल टीम
आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्र्वादी आणि शिवसेनेवर तुफान फटकेबाजी केली आहे. ते म्हणाले की, संजय राऊत शिवसेनेचे आहेत की, राष्ट्रवादीचे हेच कळत नाही असे म्हणत आपल्याला ईडीची पुन्हा नोटीस आली तर, सामोरं जाईन, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशामध्ये अनेक वर्षांपासून जाती आहेत. मात्र, 1999 ला ज्यावेळी राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण करायला लावल्याचे राज यांनी सांगितले. संभाजी ब्रिग्रेडसारख्या संघटना यांनीच तयार केल्या असे म्हणत राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद वाढल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत ते भाषण करताना नेहमी तेव्हा शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.
देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे 3 मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असे सांगत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, हनुमान चालीसा लावणारचं असेदेखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छादेखील नाही. असं ते म्हणाले.
सभेतील भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या विधानांचे तीन व्हिडिओ खास अजित पवारांसाठी लावले यामध्ये त्यांनी मशिंदींवरील भोग्यांबाबत भूमिका मांडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी 28 जुलै 2018, 1 ऑगस्ट 2018, 23 जानेवारी 2020 मधील राज ठाकरें यांनी भोंग्याबाबत त्यांची भूमिका मांडली होती.
भाषणादरम्यान, राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे भुजबळांना जेलमध्ये जावे लागले. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेते भुजबळ होते.
मनसे हा विझलेला पक्ष असल्याचे जयंत पाटील म्हणतात. मात्र, मला त्यांना सांगायचे आहे की, जंतराव मनसे हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. यावेळी राज ठाकरे यांनी जयंत पाटलांचा उल्लेख 'जंत' पाटील असा केला.
भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी दोन कायदे लागू करण्याची मागणी केली आहे. आपण देशात समान नागरी कायदा आणण्याची विनंती केली आहे. तसंच देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा आणा असे आवाहन नरेंद्र मोदींना केले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असे म्हणणारा पहिला माणूस मी होतो. त्यानंतर बाकीचे बोलले असे राज यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले की, अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी रेड होते. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंना कंस जमलं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ईडीच्या नोटीसीनंतर ट्रॅक बदलाला असे अनेकांनी म्हटले, मात्र, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर मोदींचे अभिनंदन करणारे ट्वीट माझे होते असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. मुंब्य्राची म्हैस अशी उपमा देत त्यांनी आव्हाडांवर निशाना साधलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT