Boyfriend-Girlfriend esakal
नात्यात एकमेकांसाठी आदर, प्रेम, विश्वास आणि लाईफटाइम पाठिंबा आवश्यक असतो. या प्रेमळ नातेसंबंधात, या गोष्टी नात्याला अधिक घट्ट बनवत असतात.
जेव्हा मुलगा-मुलगी नातेसंबंधात 'प्रवेश' करतात, तेव्हा ते एकमेकांना चांगलं ओळखायला लागतात. एकमेकांना समजून घेण्यासाठी एकत्र वेळही घालवायला लागतात. पण, हे सगळं करत असताना नात्यात एकमेकांसाठी आदर, प्रेम, विश्वास आणि लाईफटाइम पाठिंबा आवश्यक असतो. या प्रेमळ नातेसंबंधात, या गोष्टी नात्याला अधिक घट्ट बनवत असतात. मात्र, अनेक मुलांच्या काही वाईट सवयी त्यांच्या मैत्रिणींला सुरुवातीला त्रासदायक ठरतात. कधी-कधी या सवयींमुळे त्यांचे 'प्रेमसंबंध' तुटण्याच्या मार्गावरही पोहोचतात. म्हणूनच, आम्ही तुम्हाला मुलांच्या काही सवयींबद्दल सांगणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊयात..मुली ड्रग्स घेणाऱ्या मुलांवर नाखूश असतात. जेव्हा मुलगा धूम्रपान करतो अथवा दारूचं सेवन करत असतो, तेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडला ही सवय आवडत नाही, त्यामुळे दोघांमध्ये दुरावाही निर्माण होतो. ही सवय बदलणं हाच एक सर्वोत्तम पर्याय आहे.बरेच लोक त्यांच्या जोडीदारावर विनाकारण शंका घेत असतात, त्यामुळे बऱ्याचवेळा संबंधही तुटतात. मैत्रिणीचा फोन तपासतात, ती कोणाला भेटते, कुठे जाते, ती घरी कधी येते इत्यादी गोष्टींबद्दल अनावश्यकपणे शंका घेऊन नात्यातील संबंध बिघडवतात. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होत असतो.प्रत्येक गर्लफ्रेंडला तिच्या बॉयफ्रेंडनं तिच्याशी कॉलवर बोलावं असं वाटतं, पण अनेक मुलांची सवय अशी असते, की ते कॉलवर बोलत नाहीत. यामुळे मुली चिडतात. अशा स्थितीत, जर तुम्ही कोणत्या कामात व्यस्त असाल, तर तुम्ही कॉलवर बोलण्यासाठी एक वेळ निश्चित करायला हवी, जेणेकरून दोघांमध्ये चांगला संवाद होत राहिल.कोणत्याही मुलीला तिचा प्रियकर तिच्यापासून कोणत्या गोष्टी लपवू नये, असं वाटतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर पार्टीला जात असाल, तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला सत्य सांगावं, कारण अशा गोष्टी लपवल्यानं दोघांमधील विश्वास तुटतो आणि जिथं विश्वास राहत नाही, तिथं प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.