Rishabh Pant MS Dhoni No Ball Controversy SAKAL
फोटोग्राफी

IPL 2022: 'गुरु तसा चेला' धोनीप्रमाणेच पंतने देखील 'नो'बॉलवर घातला राडा

सामन्यातील अखेरच्या षटकातील नो-बॉलच्या वादाने वेधले लक्ष

Kiran Mahanavar

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामातला दिल्ली कॅपिटल्सचा (DC) चौथा पराभव झाला. शुक्रवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) राजस्थान रॉयल्सचा 15 धावांनी पराभव केला. या संपूर्ण सामन्यानंतर अखेरच्या षटकातील नो-बॉलच्या वादाने सर्वाधिक लक्ष वेधले.(Rishabh Pant MS Dhoni No Ball Controversy)

ऋषभ पंतने नो-बॉलबाबत पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आणि आपल्या फलंदाजांना परत बोलावण्याचे संकेतही दिले. पंतने सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनाही मैदानात पाठवले. या वादात सोशल मीडियाचे चाहते आता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मिस करत आहे.
आयपीएल 2019 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनीही पंचांच्या निर्णयावर नाराज झाला होता. त्यानंतरही नो-बॉलचा वाद झाला होता. त्यावेळी धोनी स्वतः मैदानात आला आणि त्याने अंपायरशी वाद घालण्यास सुरुवात केली. आता ऋषभ पंतनेही अशाच प्रकारच्या नो-बॉल वादाची पुनरावृत्ती केली आहे. सोशल मीडिया यूजर्स आता पंत आणि धोनीला एकत्र ट्रोल करत आहे. बहुतेक वापरकर्त्यांनी गुरू आणि शिष्य समान असल्याचे लिहिले आहे.
सामन्यात 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी 36 धावांची गरज होती. त्यानंतर रोव्हमन पॉवेलने ओबेड मॅककॉयच्या षटकातील पहिल्या 3 चेंडूंवर तीन षटकार ठोकले. इथे तिसऱ्या चेंडूवर डगआऊटमध्ये बसलेल्या ऋषभ पंतने विरोध केला आणि त्याला कमरेच्या वरचा नो-बॉल म्हटले, तर पंचांनी असा कोणताही निर्णय दिला नाही. त्यानंतर संतापलेल्या पंतने फलंदाजांना माघारी बोलावण्याचे संकेत दिले.
चेन्नई संघाला शेवटच्या 3 चेंडूत 8 धावांची गरज होती. तेव्हा बेन स्टोक्स गोलंदाजी करत होता. त्याच्या चौथ्या चेंडूच्या उंचीमुळे, पंचांनी नो बॉलचा इशारा दिला, परंतु नंतर लेग अंपायरकडून प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय मागे घेतला. त्यामुळे क्रीजवर उपस्थित असलेल्या रवींद्र जडेजाची अंपायरशी झटापट झाली. डगआऊटमध्ये बसलेला कर्णधार धोनीही मध्येच मैदानावर आला आणि पंचांशी वाद घालू लागला. मात्र, तो सामना चेन्नई संघाने ४ विकेटने जिंकला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 222 धावा केल्या. सलामीवीर जोस बटलरने 65 चेंडूत 116 धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलने 35 चेंडूत 54 आणि कर्णधार संजू सॅमसनने 19 चेंडूत 46 धावा केल्या.
प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ 8 विकेट्सवर 207 धावाच करू शकला आणि 15 धावांनी सामना गमावला. कर्णधार पंतने 24 चेंडूत 44 धावा केल्या. तर ललित यादवने 24 चेंडूत 37 आणि रोवमनने 15 चेंडूत 36 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Disruption : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई-ठाणे लोकल रेल्वेसेवा खोळंबली, प्रवाशांचे प्रचंड हाल

Kolhapur Crime News : डॉक्टर मुलीने ७८ वर्षीय वडिलांना चावून बोटचं तोडलं, छातीवर लाथ मारली अन्; कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

आनंदाची बातमी ! धावत्या रेल्वेमधून मोबाईल पडला, हेल्पलाइनवरून परत मिळवा; साखळी खेचल्यास हाेणार दंड; मदतासाठी काय करावा लागणार?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

SCROLL FOR NEXT