Saif Ali Khan Birthday  esakal
फोटोग्राफी

Saif Ali Khan: आलिशान घर आणि कोट्यावधींची संपत्ती, छोट्या नवाबची Net worth ऐकून चक्रावून जाल

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता सैफ अली खानला बॉलीवुडचा छोटा नवाब म्हटलं जातं. दशकांपासून बॉलीवुडला जोरदार चित्रपट देणाऱ्या सैफ अली खानचा आज वाढदिवस आहे. परंपरा या चित्रपटातून बॉलीवुड कारकीर्दीला सुरूवात करणाऱ्या सैफ अलीने चित्रपट करत बॉलीवुड क्षेत्रात करियरची उंची गाठली आहे. या अभिनेत्याचं आलिशान घर आणि कोट्यावधींची प्रॉपर्टी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

सैफ अली खानचं संपूर्ण कुटुंब बॉलीवुडशी जुडलं आहे. मंसूर अली खान पटौदीचे सुपुत्र सैफ अली खान त्यांच्या घराण्यातला दहावा नवाब आहे. चला तर त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया राजा महाकराजांसारखं जीवन जगणाऱ्या सैफ अली खानची नेट वर्थ.
पटौदी घराण्यातील सैफ अली खान १५ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास ११२० कोटी एवढी आहे. या अभिनेत्याजवळ घराण्यातील मालमत्ताही भरपूर प्रमाणात आहे. असं म्हटल्या जातं की त्याचा खानदानी महल ८०० कोटींपेक्षाही जास्त किमतीचा आहे.
या गोष्टीतून कमाई करतो सैफ. रिपोर्टनुसार, सैफ अली खान चित्रपटाव्यतिरिक्त प्रॉफिट शेअर पण करतो. याव्यतिरिक्त जाहिरात, ब्रँड एंडॉर्समेंट आणि अनेक गोष्टींमधून कमाई करणारा अभिनेता आहे. दरवर्षी हा अभिनेता ३० कोटी रुपये कमावतो.
सैफ अली खानची घराणे संपत्ती सोडली तर त्याची स्वत:चीही अमाप संपत्ती आहे. देशातील सगळ्यात चांगल्या अशा दहा ठिकाणच्या लोकेशनवर त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. बांद्रामध्ये असलेल्या त्याच्या बंगल्याची किंमत करोडो रुपये आहे. सैफ अली खानजवळ असे दोन बंगले आहेत ज्याला ऑस्ट्रीयन आर्कीटेक्टने डिझाईन केले आहे. मुंबईमध्ये सैफचं रेसिडेंसी हॉटेलजवळ टर्नर रोडवर एक लक्झरी अपार्टमेंट आहे. करीना आणि मुलांसह सैफ याच अपार्टमध्ये राहातो.
सैफच्या कारची किंमतही कोट्यावधींमध्ये आहे. सैफला लक्झरी कारचं वेड आहे. ऑडी, बीएमडब्ल्यू 7 सीरीज लेक्सस 470, मस्टांग, रेंज रोवर आणि लँड क्रूजर यांसारख्या लक्झरी गाड्या त्याच्याजवळ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ट्रम्प सोडा आता केजरीवालांना सुद्धा हवा नोबेल पुरस्कार! गाजणारा दावा सोशल मीडियावर चर्चेत

Viral: नेत्यानंतर सामान्य जनताही 'डान्सिंग कार' मध्ये! कॉलेजसमोर गाडीत जोडपं आक्षेपार्ह अवस्थेत दिसलं, व्हिडिओ व्हायरल

Video : आज्जी बाई मोडकळीस आलेल्या पूलावरून निघाल्या, पण बघताना प्राण आले कंठाशी! तेवढ्यात....; पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ

Nashik Crime : आरोग्य खात्यात नोकरीचं आमिष, ९० जणांची दीड कोटींची फसवणूक

Nashik Pipeline Scam : पाणीपुरवठा थेट जलवाहिनी दरात गोंधळ; महासभेला डावलून अटींमध्ये बदल

SCROLL FOR NEXT