Shri Krishnabai Festival esakal
कऱ्हाड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कृष्णाबाईची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली.
कऱ्हाड (सातारा) : शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कृष्णाबाईची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. दोन वर्षांनंतर यात्रा भरल्याने कृष्णामाई घाटाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. कृष्णाबाईची ओटी भरण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.कृष्णाबाई यात्रा महोत्सव रविवारपासून सुरू झाला. चार दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.काल यात्रेचा मुख्य दिवस होता. यात्रेच्या निमित्तानं सकाळपासूनच महिलांनी कृष्णाबाईच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कृष्णाबाई मंदिर परिसरात खणा-नारळ विक्रीचे स्टॉल थाटण्यात आले होते.महिलांनी खणा-नारळाने कृष्णाबाईची ओटी भरण्यासाठी वाळवंटात गर्दी केली होती. यात्रेसाठी कृष्णा घाट व वाळवंटात मोठ्या प्रमाणात खेळणी दाखल झाली आहेत.बालगोपाळांनी खेळण्यांचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळनंतर कृष्णाबाई घाटाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.