नववर्षानिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरास फळा-फुलांची आकर्षक आरास Sakal
फोटोग्राफी

नववर्षानिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरास फळा-फुलांची आकर्षक आरास

नववर्षानिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरास फळा-फुलांची आकर्षक आरास

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : इंग्रजी नवीन वर्षारंभाच्या 2022 (New Year 2022) निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात विविध रंगांची तब्बल 1500 किलो फुले आणि 700 किलो फळे वापरून मनमोहक आरास करण्यात आली आहे. फुलांची आरास करण्यासाठी प्रदीप प्रकाश ठाकूर पाटील (आळंदी, पुणे) यांनी फुले उपलब्ध करून दिली. (Shri Vitthal-Rukmini temple in Pandharpur decorated with various flowers and fruits)

विविध सण आणि राष्ट्रीय उत्सव, एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली जाते. अनेक भाविक त्यासाठी आधी मंदिर समितीशी संपर्क साधून आवश्‍यक ती फुले आणि फळे उपलब्ध करून देत असतात.
इंग्रजी नवीन वर्षारंभाच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचा गाभारा आणि मंदिरातील अन्य भागात फळाफुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
यासाठी गुलाब, जरबेरा, ब्लू डीजे, कामिनी, शेवंती, ऑर्केड, मिनीपाम, सॅंगोप, ड्रेसीना सायकस या वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.
याशिवाय केळी, अननस, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब अशा विविध फळांची आणि पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली आहे.
शिंदे ब्रदर्स, साई डेकोरेटर्स, पंढरपूर यांनी आरास डेकोरेशनचे काम केले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात करण्यात आलेली ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. इंग्रजी नवीन वर्षाच्या निमित्ताने परगावाहून देखील मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दर्शनासाठी आले असल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT