Sukh Mhanje Nakki Kay Asta
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण साडीमध्ये पहात आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे. जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजिय केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. पार्टी गाऊनमधला गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर परी म्हणू की अप्सरा ही एकच भावना आहे. या पार्टीसाठीची सगळी तयारी जयदीपनेच केलीय. पार्टीमध्ये काय घालायचं, कसं वावरायचं या सगळ्या टिप्स जयदीपने गौरीला दिल्या आहेत.गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा स्वतःला या नव्या रुपात पाहून फारच भारावून गेलीय. संपूर्ण टीमने मिळून तिचा हा लूक डिझाईन केला आहे. गौरीचा हा हटके अंदाज पुढील आठवड्यात रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.