Actress
pregnant before marriage esakal
चित्रपटसृष्टीत अभिनेत्री आणि अभिनेते कोणत्यानं कोणत्या कारणाने र्चेचेत असतात. अशा काही अभिनेत्री ज्यांनी गुपचूप लग्न केल किंवा लगेच बाळाला जन्म दिला .
रविवारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा हिने देखिल लग्नाच्या चार महिन्यांनंतर आई झाल्याची घोषणा केली. नयनताराने विग्नेश शिवनसोबत जून महिन्यात लग्न केले. अवघ्या चार महिन्यात त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. नयनतारा बरोबरच अशा काही अभिनेत्री ज्यांनी लग्नाच्या काही दिवसातच बाळाला जन्म देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
या यादीत बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचाही सामावेश आहे. लग्नांच्या दोन महिन्यानंतर त्यांनी लगेचच गुडन्यूज दिली.या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि सोशल मीडियावर आलिया लग्नाआधीच गरोदर असल्याच्या चांगल्या चर्चाही बऱ्याच रंगल्या. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि ‘बधाई हो’, ‘शुभ मगंल ज्यादा सावधान’ अशा चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री नीना या देखील लग्नाआधीच गरोदर झाल्या होत्या. नीना गुप्ता यांचा विवाह वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्या सोबत विवाह केला.मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यांनी सिंगल पालक बनून त्यांची मुलगी मसाबा हिच संगोपण केल. माजी मिस इंडिया युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीही 2011 मध्ये पीटर हागसोबत लग्न झाली. मात्र, लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यामुळे ती लग्नाअगोदरच गरोदर असल्याचे म्हटंले जाते. तिचे नो एन्ट्री, अपना सपना मनी मनी, गोलमाल रिटर्न्स यांसारखे काही चित्रपट गाजलेले आहेत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी केवळ अभिनयासाठीनेच नव्हे तर त्यांच्या सौंदर्यानेही लोकांना वेड लागले होते. लग्नाआधी श्रीदेवी 6 महिन्यांची गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी 1996 मध्ये निर्माता, दिग्दर्शक बोनी कपूरसोबत लग्न केले होते. लग्नानंतर एका वर्षाच्या आत श्रीदेवी यांनी मुलगी जान्हवी कपूरला जन्म दिला होता. बॉलिवूडची अभिनेत्री नेहा धूपियाचा देखील या यादित सामावेश होतो. मे 2018 मध्ये अंगद आणि नेहाने गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि काही दिवसांनंतर गर्भधारणेची माहिती दिली. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर, त्यांनी पहिली मुलगी मेहरचे स्वागत केले. दरम्यान अंगद बेदीने नेहाच्या 'नो फिल्टर नेहा' शोमध्ये ती लग्नाआधी गर्भवती झाली असल्याचा खुलासा केला होता.अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने 2010 मध्ये तिचा प्रियकर अभिनेता रणबीर शौरीसोबत गुपचूप लग्न केले होते.लग्नाच्या केवळ सहा महिन्यांनंतरच तिने मुलाला जन्म दिला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.