these marathi celebrities visited pandharpur ashadhi wari 2022  sakal
फोटोग्राफी

Photo: 'या' कलाकारांनी घेतला यंदा वारीचा आनंद, गजर करत धरला ठेका..

आषाढी वारीच्या या अनुपम सोहळ्याची यंदा वारकऱ्यांप्रमाणे मराठी कलाकारांनाही भुरळ पडली.

नीलेश अडसूळ

विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातला महाउत्सव आणि सर्वात मोठा सण म्हणजे पंढरीची वारी. महाराष्ट्रभरातून लाखो भाविक या सोहळ्यात जात, धर्म, पंथ विसरून सहभागी होत असतात. असतात म्हणतात आयुष्यात एकदा तरी हा वारीचा चिंतनसोहळा अनुभवायला हवा. दोन वर्षांनी होणाऱ्या या वारीने वारकऱ्यांना तर हरी रंगात नाचवलंच पण मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही पंढरपूर वारीकडे धाव घेतली. तिथे ते रमले, नाचले, सेवा केली आणि वारीच्या, हरीनामाच्या गजरात नाहून निघाले. यंदा अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (prajakta gaikwad) , दीपाली सय्यद (deepali sayyad) , संदीप पाठक (sandeep pathak) , स्पृहा जोशी (spruha joshi), अश्विनी महांगडे (ashwini mahangade), स्वप्निल जोशी (swapnil joshi) आदी कलाकार वारीत सहभागी झाले होते. त्याची ही क्षणचित्रे...

(these marathi celebrities visited pandharpur ashadhi wari)

स्वराज्यरक्षक संभाजी आणि आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं यंदा वारीचा अनुभव घेतला. 'शब्दात मांडता न येणारा असा या वर्षीचा वारीचा अनुभव आहे. आत्मिक समाधान म्हणजे वारी. वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारी भक्ती म्हणजे वारी', अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
अभिनेता स्वप्नील जोशी यानेही वाखारी ते पंढरपूर पायी वारी केली. स्वप्नील म्हणतो, 'काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो. अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली. कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे. बघू, पांडुरंग कधी संधी देतो.'
अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यदही यंदा वारीत सामील झाल्या होत्या. महाराष्ट्रावर आलेली संकटं दूर होऊन चांगले दिवस येऊ दे; असे दीपाली सय्यद यांनी विठूरायाला साकडे घातले.
अभिनेता संदीप पाठक सध्या वारीच्या हरिरसात न्हाऊन गेला आहे. 'टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची' अशीच काहीशी अनुभूती मागील काही दिवसांपासून संदीप घेत आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तो वारी करत असला तरी एखाद्या वारकऱ्या प्रमाणेच तो मनोभावे वारीत रंगला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडही वारीत सहभागी झाली होती. तिनं तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर केला. इतकच नाही टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरिनामाचा गरज करत तिनं पारंपरीक भजनांवर ठेकाही धरला.
पुण्यात माऊलींची पालखी दाखल झाली त्यावेळी अभिनेत्री स्पृहा जोशी वारीत सहभागी झाली होती. वैष्णवांचा मेळा हरीभक्तीत तल्लीन झालेला पहिल्यांदाचा पाहिला असल्याचा अनुभव स्पृहाने यावेळी शेअर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT