जपानची राजधानी टोकियोत पॅरालिंपिक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या देशातील स्पर्धक आपल्यातील जिद्द आणि चिकाटी दाखवून देत आहे. प्रत्येक स्पर्धकाची कहाणी प्रेरणादायी अशीच आहे. स्पर्धेतील काही क्षण जगात अशक्य काहीच नाही याचा संदेश देणारे आहेत.
100 मीटर फ्रीस्टाइल S7 प्रकारात गोल्ड मेडल मिळवल्यानंतर भावनिक झालेली इटलीची जिउलीया तेर्जीपुरुष गटातील उंच उडी T63 प्रकारात सॅम ग्रेवे याने सुवर्ण कामगिरी केली. या क्रीडा प्रकारात भारताला मरियप्पन आणि शरद कुमार यांनी रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली होती. फ्रान्सचा फ्लोरिन जाउनी याने H1-2 रोड रेस क्रीडा प्रकारात गोल्डन कामगिरी करुन दाखवलीयेस्पर्धेत सहभागी झालेली ही स्पर्धक कोणत्या देशाची हे महत्त्वाच नाही. पण या फोटोला काय कॅप्शन द्याल, असा प्रश्न टोकियो ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाइटवरुन विचारण्यात आलाय.कंबरेपासून एक पाय नाही तरीही सायकलिंगमध्ये भाग घेतलेली एक स्पर्धक Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.