फोटोग्राफी

तासाभराच्या पावसाने कशी होतो दाणादाण पहा फोटोंमध्ये

नीलेश डाखोरे

नागपूर : मॉन्सूनच्या (Monsoon) प्रतीक्षेत असलेल्या उपराजधानीला मंगळवारी वादळी पावसाने जोरदार दणका (Heavy rains in Nagpur) दिला. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह बरसलेल्या पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादाण उडविली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने आलेल्या वादळामुळे अनेक झोपड्या व घरांवरील छप्पर व टिनाची पत्रे उडून गेली. रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक चौकांमध्येही वाहतुकीची कोंडी (Traffic jams at intersections) झाली. मृग नक्षत्रातील या पहिल्याच पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. व्हेरायटी चौक, जगनाडे चौक, मेडिकल चौक, अशोक चौक, सिद्धेश्वर हॉलसमोरील मानेवाडा रोड, अयोध्यानगर पोस्ट ऑफिससमोरील रस्ता, आशीर्वादनगर, रेशीमबाग मैदानासमोरील रस्त्यासह शहरातील अनेक भागातील लहान मोठया रस्त्यांवर पाणी साचले. (फोटो - प्रतीक बारसागडे) (Trees-fell-horizontally-on-the-roads-due-to-torrential-rains)

तासाभराच्या पावसानंतर नरेंद्रनगर पुलाखाली नेहमीप्रमाणेच असे पाणी साचले होते.
सायंकाळी काही भागांत हलका शिडकावा झाल्यानंतर मंगळवारीही वादळी पावसाने शहरात दमदार हजेरी लावली. रहाटे कॉलनी चौकात रस्त्यावर झाड पडल्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली होती.
रहाटे कॉलनी चौकात रस्त्यावर पडलेले झाड कापताना नागरिक.
एका पावसात झाड उन्मळून पडल्याने नागरिकांची चांगलीच कोंडी झाली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी झाडे हटविली.
मृग नक्षत्रातील या पहिल्याच पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. व्हेरायटी चौक, जगनाडे चौक, मेडिकल चौक, अशोक चौक, सिद्धेश्वर हॉलसमोरील मानेवाडा रोड, अयोध्यानगर पोस्ट ऑफिससमोरील रस्ता, आशीर्वादनगर, रेशीमबाग मैदानासमोरील रस्त्यासह शहरातील अनेक भागातील लहान मोठ्या रस्त्यांवर पाणी साचले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT