तुळजाभवानी मंदिराला रंगीबेरंगी फुलांची आरास esakal
तुळजापूर (उस्मानाबाद ): अश्विनी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेचे मंदिर पुण्यातील भाविक आर. आर. किराड यांनी 12 टन फुलांनी बुधवारी (ता.20) सजविले. यंदाच्या फुलांच्या रोषणाईमध्ये अनेक अमुलाग्र बदल करण्यात आलेले आहेत.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मंगळवारी सायंकाळी पासूनच सुमारे 100 ते 125 फुले सजविणाऱ्या कामगारांनी मंदिराच्या परीसरात फुलांच्या माळा तसेच वेगवेगळी प्राणी, पक्षी फुलांनी तयार करून ठेवण्यात आली होती. तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावर, सिमोल्लंघन पारावर शेषशाही नागामध्ये आरूढ झालेली तुळजाभवानी ठेवण्यात आलेली आहे. तसेच गोंधळी कट्ट्यावर फुलपाखरे आणि तुळजा भवानी मंदिरातील पाच पायऱ्यावर ही फुलांची फुलपाखरे करण्यात आली आहेत. तुळजाभवानी मातेचा मुख्य गाभारा फुलांनी सजविण्यात आलेला आहे. तसेच मंदिराच्या सभोवती पूर्णतः फुलांच्या लगडीत अनाथ नाथे अंबे लिहिलेले आहे. तुळजाभवानी मातेच्या सिमोल्लंघन पारासमोर महंत तुकोजी बुवा तसेच फुलांची रोषणाई करणारे भाविक आर. आर. किराड यांच्या हस्ते पुजन मंगळवारी (ता.19) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. यावेळी महंत तुकोजी बुवा म्हणाले की, तुळजाभवानी मातेच्या महाद्वारात आर. आर. किराड या भाविकाने केलेली फुलांची रोषणाई कौतुकास्पद आहे. श्री किराड यांनी मोठ्या श्रद्धेने फुलांची रोषणाई केलेली आहे असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात फुलांची रोषणाई करणारे पुण्यातील भाविक आर आर किराड यांनी सांगितले की, 12 टन फुलांचा वापर तुळजा भवानी मंदिरातील फुलांच्या रोषणाईसाठी करण्यात आलेला आहे. तसेच तुळजा भवानी मंदिरातील प्रशासनाचे तसेच महंत तुकोजी बुवा यांचे मोठे सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. पाच टन परदेशी फुले आणि सात टन आपल्या देशातील वेगवेगळ्या जातींची फुले रोषणाई साठी वापरण्यात आलेली आहेत, असेही त्यांनी 'सकाळ'ला सांगितले. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.