Tuljabhavani Mata Jalyatra esakal
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेची जलयात्रा शुक्रवारी (ता.१४) पार पडली. यंदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने जलयात्रा परंपरेने पार पडली. शहरातील पापनास तिर्थ कुंडाच्या इंद्रायणी मंदिरापासून जलयात्रेस प्रारंभ झाला. सकाळी सात वाजता जलयात्रेस प्रारंभ झाला.
भवानी रस्ता मार्गे तुळजाभवानी मंदिरात जलयात्रा सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आली. अग्रभागी शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे यजमान प्रवीण कदम त्यांच्या पत्नी मंजूषा कदम होत्या. पापनास तिर्थ कुंडापासून निघालेल्या जलयात्रेत मर्यादित महिला यंदा सहभागी झाल्या होत्या. परंपरेने जलयात्रा तुळजाभवानी मंदिरात आल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यात जलयात्रेचे पाणी अर्पण करण्यात आले. तसेच महिलांची औटी भरण्यात आली. जलयात्रेत यंदा महिलांची संख्या मर्यादित ठेवण्याचे प्रशासनाने निश्चित केले होते. त्याची अंमलबजावणी यंदा झाली. यावेळी तुळजाभवानी मंदिराच्या सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे, तुळजाभवानी मातेचे महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, नागेश शितोळे, सिद्धेश्वर इंतुले, निलेश रोचकरी, तुळजा भवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, अंबादास औटी, तुळजा भवानी उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, उपाध्यक्ष मकरंद प्रयाग, सुनित पाठक, राजन पाठक, किरण पाठक, श्रीराम अंबुलगे, दादा ढोले, माणिक कांबळे, निलोत्तम जेवळीकर आदी उपस्थित होते. मकरसंक्रांतीच्या दिवशी तुळजाभवानी मातेची जलयात्रा आली. त्यामुळे दोन्ही ही उत्सव एकाच दिवशी आल्याचा योगायोग यंदा आला.तुळजाभवानी मातेची शुक्रवारी शेषशाही अलंकार महापुजा मांडण्यात आली होती.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.