जपानची राजधानी टोकियोला बुधवारी भुकंपाचे जोरदार हादरे बसले. स्थानिक वेळेनुसार तिथे रात्री ८ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती.
जपानमध्ये किनारपट्टीवर असलेल्या फुकुशिमाला याचा फटका बसला आहे. भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आली आहेटोकियेच्या पूर्व-उत्तर बाजूला २९७ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. भूजपानमधील २० लाख घरांमधील वीज गेल्याचे वृत्त एफपीने दिले आहे.जपानमध्ये रात्री भूकंपामुळं झालेल्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आलीय. यासोबतच मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाले आहेत या भूकंपामुळं जपानमधील शिरोशी इथं बुलेट ट्रेनही रुळावरून घसरलीय. 2011 च्या आपत्तीला 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भूकंप आलाय. केंद्रानं (Pacific Tsunami Warning Center) सांगितलं की, यापुढं त्सुनामीचा धोका नाही. मात्र, जपानच्या हवामान खात्यानं कमी धोक्याचा इशारा दिलाय.फुकुशिमा मध्ये भूकंप के बाद अनेक परिसरातील रस्त्यांचे नुकसान झाले. टोकियोसह पूर्व जपानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तर जपानमधील या मॉलचे भूकंपानंतर मोठे नुकसान झाले.भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की शॉपिंग मॉल्समधील कपाटांतून सामान पडू लागले.या भूकंपांनी जपानच्या लोकांना 2011 ची आठवण करून दिली. 11 मार्च 2011 हा जपानसाठी अभूतपूर्व अपघाताचा दिवस होता.
या दिवशी, 9 तीव्रतेच्या भूकंपाने ईशान्य जपानचा किनारा हादरला, ज्यामुळे त्सुनामी आली ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. आजही जपान या अपघातातून सावरलेला नाही. या भूकंपात 18,000 लोकांचा मृत्यू झाला होता.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.