Upcoming Smartphones
Upcoming Smartphones Google
फोटोग्राफी

डिसेंबर महिन्यात लॉंच होतयत 'हे' दमदार स्मार्टफोन्स; पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

डिसेंबर महिन्यात भारतासह जगभरात अनेक दर्जेदार स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होत आहेत. यामध्ये Xiaomi OnePlus, Motorola आणि Micromax कंपन्यांचे स्मार्टफोन्सचा समावेश आहे. आज आपण या चालू असलेल्या डिसेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणाऱ्या काही दमदार स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत..

Xiaomi 12 सीरीजच्या लॉन्चबद्दल बोलायचे झाले तर, Xiaomi 12 ची अंदाजे लॉन्च तारीख 12 डिसेंबर असून हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला जाईल आणि पुढील वर्षी हा स्मार्टफोन जागतिक स्तरावर लॉन्च केला जाईल. काही रिपोर्टनुसार या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC प्रोसेसर दिला जाईल. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल तसेच 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. अपेक्षित किंमत - रु. 69,999
OnePlus RT 5G या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 888 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सेल सोनी IMX766 प्रायमरी कॅमेरा असेल. अपेक्षित किंमत - 40,000 रु
Moto G200 मध्ये Snapdragon 888 Plus सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच 108-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाईल. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाईल, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अपेक्षित किंमत - 37,999 रुपये आणि लॉंचची अपेक्षित तारीख - 15 डिसेंबर 2021
Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 480+ प्रोसेसर दिला जाईल. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट दिला जाईल. फोनमध्ये 6.8-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल तसेच 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. अपेक्षित किंमत - 20,000 रुपये आणि लॉंचची अपेक्षित तारीख - 31 डिसेंबर 2021
Micromax In Note 1 Pro मॉडेल क्रमांक E7748 सह स्पॉट झाला आहे. लिस्टींगमधील फीचर्सनुसार, फोन MediaTek Helio G90 चिपसेट सपोर्टसह ऑफर केला जाऊ शकतो. फोन किमान एका व्हेरिएंट 4GB RAM सह येण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये Android 10 सपोर्ट दिला जाऊ शकतो. अपेक्षित किंमत - 12,999 रुपये आण अपेक्षित असलेली लॉंचची तारीख ही 2 डिसेंबर 2021 आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT