kolhapur
kolhapur esakal
फोटोग्राफी

PHOTO: पंचगंगा पुन्हा प्रदूषित; पाण्यात आढळला मृत माशांचा खच

सकाळ डिजिटल टीम

पंचगंगा नदी पात्रात शिये पुलाजवळ प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळल्याने आज पुन्हा पात्रात मृत माशांचा खच दिसला. मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषित झाल्याने काही मासे काठावरही तडफडून मरताना दिसत होते. यावेळा मासे नेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.

पंचगंगा नदी पात्रात शिये पुलाजवळ प्रदूषित पाणी थेट नदीत मिसळल्याने आज पुन्हा पात्रात मृत माशांचा खच दिसला.
मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषित झाल्याने काही मासे काठावरही तडफडून मरताना दिसत होते.
नदी काठावर पडलेल्या मृत माशांना नेण्यासाठी औद्यागिक वसाहतीतील परप्रांतीय कामगारांनी एकच गर्दी केली होती. अनेकांनी पोती भरून मेलेले मासे नेले.
महिन्यापूर्वी बावडा-शिये रस्त्यावरील शिये पुलाजवळ रकटे-पाटील यांच्या शेताला लागून असलेल्या पंचगंगेच्या पात्रात अशाच मृत माशांचा खच पडला होता.
पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने मासे तडफडून मरताना दिसत होते. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन नदीत दूषित पाणी मिसळत असल्याबाबत पाहणी केली होती.
परिसरातील शेतकरी नदीवर गेले असताना त्यांना मोठ्या प्रमाणात मासे तरंगताना दिसले. काही मासे तडफडून काठावर येऊन मृत झाले होते.
काही माशांची जगण्याची धडपड सुरू होती; पण ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत होताना दिसत होते. परिसरात दूषित पाणी मिसळत असल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT