World Ozone Day Esakal
फोटोग्राफी

World Ozone Day: जागतिक ओझोन दिवस का साजरा करावा?

ओझोन हा फिक्कट निळ्या रंगाचा वायू असतो.

सकाळ डिजिटल टीम
16 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जाहीर केला.
ओझोन थरामध्ये छिद्र आहे? पृथ्वीभोवती ओझोनचा थर आहे. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपला बचाव होतो. पर्यावरणीय बदलामुळे ओझोनच्या थरामध्ये छिद्रे होत असल्याची चर्चा आपण नेहमी ऐकतो.
अतिनील किरणांपासून होतो बचाव ओझोनचा थर हा आपल्या अवकाशात एका नाजूक पातळ थरासारखा असतो. यामुळे सूर्यातून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून आपला बचाव करतो. याउलट आपल्या आजूबाजूला असणारा (ग्राउंड लेव्हल ओझोन) वातावरणाला नुकसान पोहचवणारा आहे.
ओझोन म्हणजे काय? ओझोन हा फिक्कट निळ्या रंगाचा वायू असतो. ओझोनला एक तीव्र वास येतो. ओझोनचे रेणूसूत्र O3 आहे.
अंटार्क्टिकजवळ ओझोनच्या थराला छिद्र? ओझोनच्या थराला छिद्र आहे असे म्हटले जाते. मात्र, छिद्र दिसत नाही. अंटार्क्टिकजवळील परिसरात वातावरणातील ओझोनच्या थर कमी झाला आहे.
ओझोन थरावर याचा होतो परिणाम पृथ्वीपासून 16 ते 50 किमीच्या पट्ट्यात ओझोनचा थर आढळतो. हा थर निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते. मात्र, क्लोरोफ्लोरो कार्बन, क्लोरीन आणि ब्रोमीनसारख्या गॅसचा परिणाम ओझोनच्या थरावर होतो.
आपण काय केलं पाहिजे? ओझोनच्या थराचा बचाव करण्यासाठी आपणदेखील प्रयत्न करायला हवे. शक्य तेवढा वाहनांचा प्रवास टाळावा. वाहनांमुळे होणारे प्रदुषण ओझोनसाठी घातक आहे. त्याशिवाय रासायनिक किटकनाशकांचा वापर थांबवायला हवा. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT