जिल्ह्यातील पाणथळ भागात सुमारे १४ प्रजातींचे पाणबदक शेकडो किंवा हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावतात. काही पाणबदक परेदशातून आलेले असतात. तर काही बदक स्थानिक स्थलांतरीत बदक म्हणून ओळखले जातात.
जिल्ह्यातील पाणथळ भागात सुमारे १४ प्रजातींचे पाणबदक शेकडो किंवा हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावतात. काही पाणबदक परेदशातून आलेले असतात. तर काही बदक स्थानिक स्थलांतरीत बदक म्हणून ओळखले जातात. दत्तात्रय लांघी
फोटोग्राफी

गुलाबी थंडीची चाहूल आणि पाणवठ्यावरील पानबदकं : पाहा खास फोटो

दत्ता लवांडे

थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे वाटचाल करीत हे पाणबदक मोठ्या संख्येने या जलाशयांवर दाखल झाले आहेत.

गुलाबी थंडीची चाहूल सुरू झालेली असताना आता जिल्ह्यातील विविध पाणवठ्यांवर पाणबदकांचे वास्तव्य आढळून येवू लागले आहे. जिल्ह्यातील खडकवासला धरण, पाषाण तलाव, कात्रज तलाव, येरवड्याचे मुळा -मूठा नदी पात्र, कवडीपाट, पाटस तलाव, वीर धरण, इंदापूर तालुक्यातील भादलवाडी तलाव व उजनी जलाशयावर गेल्या काही दिवसांपासून पाणबदकांची संख्या वाढू लागली आहे.
पर्वतमार्गे किंवा समुद्रमार्गे स्थलांतर करत हे पक्षी येथे आलेले असतात. या पक्षांचा मार्च ते एप्रिलपर्यंत येथे मुक्काम असतो. या काळात मुबलक मिळणाऱ्या खाद्यान्नावर ताव मारुन शरीरात भरपूर उर्जा साठवतात.
जिल्ह्यातील विविध जलाशयांवर पट्टकादंब, सुरूची, चक्रवाक, हळदी कुंकू, चक्रांग, ब्राम्हणी बदक, थापट्या, भिवई, शेंडी बदक, सर्जा, अडई आदी सुमारे १३ ते १४ प्रजातीचे पाणबदक पाहावयास मिळत आहेत.
उजनी व वीर धरणाच्या परिसरात पट्ट कादंब, सुरूची, चक्रवाक या प्रजातीचे पाणबदक आढळतात. तर खडकवासला धरण परिसरात काणूक बदक, लालचारी, वैष्णव व शेंडीबदक आढळून येतात. पाषाण तलावावर मराल (अडई), नकटे बदक आढळतात. कवडीपाठमध्ये चक्रांग, थापट्या, धनवार व मलीन बदक आढळून येतात.
बदकांसाठी पाणथळ ठिकाणे जोपासण्याची गरज आहे. सध्या उजनीतील रसायनमिश्रीत पाण्यामुळे येथे आलेल्या बदकांना खाद्यान्न मिळणे कठीण झाले आहे. तर जिल्ह्यातील पाषाण तलाव, खडकवासला धरण, जांभूळवाडी तलाव, येरवडा नदीकाठच्या भागात सुशोभीकरणामुळे या बदकांच्या खाद्यान्नावर गदा आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT