gaganbawada rice farming 
फोटोग्राफी

PHOTO : गगनबावड्यात पावसाच्या पाण्याशिवाय रोप लावणीला सुरूवात

पाणी उपसा करून आणि मनुष्यबळाचा वापराने रोपलावणीचे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहे.

पंडित सावंत

ऐन जुन महिन्यात पावसाने दडी मारली आहे. दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसापासून शेतीपंपाद्वारे नदीपात्रातील पाणी उपसा करून गगनबावडा तालुक्यात शेतकऱ्यांनी रोप लावणीस सुरूवात केली आहे. पाणी उपसा करून आणि मनुष्यबळाचा वापराने रोपलावणीचे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहे. तालुक्यात सर्वत्र असे चित्र पहायला मिळत आहे.

पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्यात पावसाच्या पहिल्या महिन्यातच पावसाने पाठ फिरवली.
तालुक्यातील शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पहात आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पेरणी केलेली भातरोपे लावणी योग्य झाल्याने पाऊस नसताना रोपलावण करावी लागत आहे.
शेतकरी वर्गाने रोपलावणीला सुरूवात केली आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वत्र लावण पद्धतीने भातपीक घेतले जाते. गादीवाफ्यावर भाताची रोपे तयार केली जातात. त्यासाठी एप्रिल व मे महिन्यात वाळलेला पाला, शेण, झाडांच्या वाळलेल्या फांद्या एखाद्या वाफ्यामध्ये पेटवून तरवा तयार केला जातो.
मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात या तरव्यावर भाताची रोपे तयार करण्यासाठी पेरणी केली जाते. साधारणतः तीन आठवडयाच्या कालावधीनंतर ही रोपे लावणीयोग्य झाल्यानंतर भात रोपलावण केली जाते.
यांत्रिकीकरणाच्या युगात तालुक्यातील बैलजोडींची संख्या कमी झाल्याने पॉवर ट्रेलर, लहान ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखल केला जात आहे.
काही मोजक्याच शेतकरी वर्गाकडे बैलजोडी आहे. असे शेतकरी चिखलगुठ्ठा पद्धतीने चिखल करतात.
गुठ्ठा पध्दतीने चिखल केल्यामुळे जमिनीचे सपाटीकरण होण्यास मदत तर होतेच, शिवाय तणांचे प्रमाणही खूप कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT