सोलापूर: सोलापूरहून अक्कलकोट व तुळजापूर या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांवर कुरनूर धरणाचे पक्षी पर्यटन ही पर्यटक, निसर्ग अभ्यासक, निसर्गप्रेमींसाठी मोठी पर्वणीच आहे. धरणावरील पाणपक्षी, बेटावरील जंगलातील पक्षी यासह निसर्गाच्या अनेक बाबींचा अभ्यास करण्यासाठी हे धरण एक आगळवेगळे पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे.
कुरनूर धरण हे हरणा व बोरी या दोन नद्यांच्या संगमावर बांधलेले आहे. या धरणाच्या उभारणीच्या इतिहासाला सीमावादाची झालर आहे. पण नंतरच्या काळात उभारणीचे काम पूर्ण झाले. या दोन नद्यांच्या संगमावर एका उंच भागावर झुडपे व झाडे कायम राहिली. या बेटावर सर्वात मोठी पक्षीसंख्या पाहण्यास मिळते. - पाण्यावर आधारीत जैवसाखळीतील अनेक घटक याठिकाणी अभ्यासता येतात. तसेच धरणाला लगत विस्थापित झालेल्या बावकरवाडी परिसरात पक्ष्यांची गर्दी असते.सामाजिक वनीकरण खात्याने विकसित केलेल्या परिसरात फुलपाखरांचे ४० प्रकार पाहण्यास मिळतात. येथील शिवालयात विश्रांती व वनभोजनाचा आस्वाद घेता येतो. या भागातील ग्रामस्थदेखील घरगुती भोजन उपलब्ध करुन देतात.यावेळी पक्षी अभ्यासक शिवानंद हिरेमठ म्हणाले, कुरनूर धरण हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचे पक्षी निरीक्षण केंद्र आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासकां साठीही ते मोलाचे आहे. राज्यात एवढ्या अधिक प्रकारचे पक्षी येथे पाहण्यास मिळतात. अक्कलकोट व तुळजापूर या दोन शहराच्या मार्गावर असल्याने पर्यटकांसाठी ही पर्वणीच असते. वर्षभर येथे अनेक पक्षी अभ्यासक येथे येत असतात.धरणावरील पक्ष्यांचे जग :- या धरणाच्या परिसरात १४५ ते २०० प्रकारचे पक्षी पाहण्यास मिळतात. पाणपक्षी, झुडपी अधिवासाचे पक्षी. स्थानिक स्थलांतरीत, विदेशातून स्थलांतरीत पक्ष्यांची हजेरी. विदेशी पक्षी फ्लेमिंगो, बार हेडेड गूज यांची हजेरी. राज्यपक्षी हरियालचे वास्तव्य. पांढऱ्या भिवईचा बूलबूल, इंडियना स्वीमर (पानचिरा), निलांग हे अतिदुर्मिळ पक्षी निरीक्षणासाठी उपलब्ध. बेमोसिल क्रेन म्हणजे कांडे करकोचाचे वास्तव्य. ४० प्रकारचे फुलपाखरांचे वास्तव्य.धरणाच्या ठिकाणी सुविधा: अक्कलकोट येथे निवासाची सुविधा, चपळगाव येथे व रस्त्यावर भोजन व हॉटेलची सोय, परत येऊन सोलापूर येथे मुक्कामाच्या सोयी उपलब्ध, सोलापुरातून एक दिवसाचे स्टेकेशन शक्य कसे पोहचाल कुरनूर धरणावर: सोलापूर शहरातून अक्कलकोटला जाताना वळसंगला उतरून तीर्थ, चपळगावमार्गे कुरनूर धरण, अक्कलकोट येथून हन्नूरमार्गे कुरनूर धरण, सोलापूर- हैद्राबाद रस्त्यावर मुळेगाव, धोत्री, हन्नूरमार्गे कुरनूर धरण, अक्कलकोट व तुळजापूर दर्शनासाठी आलेल्या भाविक व पर्यटकांना मध्यवर्ती पर्यटन केंद्र, सोलापूरपासून ३० ते ४० किमी अंतर.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.