bag returned esakal
जळगाव

Jalgaon News : बसमध्ये राहिलेली 1 किलो चांदीची बॅग सराफास परत; ST आगार कर्मचाऱ्यांची तत्परता

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : येथील आगाराच्या बसमध्ये राहिलेली नगरदेवळा येथील सराफाची ६५ हजार किमतीची एक किलो चांदीची बॅग आगार कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सापडली असून, ही बॅग सराफास परत देण्यात आली आहे. (1kg silver bag left in bus returned to Sarafas Readiness of ST Agar staff Latest Jalgaon News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

पाचोरा आगाराच्या जळगाव- पाचोरा बसमधून (एमएच २०, बीएल १८३६) नगरदेवळा येथील सराफ रोहीत सोनार प्रवास करीत होते. बसमधून उतरताना ६५ हजार रुपये किमतीची एक किलो चांदी असलेली बॅग ते बसमध्येच विसरले. घरी येत असताना बॅग बसमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला मित्र गोलू पाटील यास या संदर्भात माहिती दिली. गोलू पाटील यांनी पाचोरा आगारातील कर्मचारी प्रयास पाटील यांना याबाबत माहिती दिल्यानंतर प्रयास पाटील यांनी अतिशय तत्परतेने सर्व सूत्र हलविली व ही बस आगारात तपासली असता त्यांना बसमध्ये बॅग आढळली.

त्यात एक किलो चांदी होती. त्यांनी सराफ रोहित सोनार यांना आगारात बोलवून योग्य ती खात्री करून घेतल्यानंतर त्यांना बॅग परत दिली. या वेळी दिनकर पाटील, राहुल पाटील, गुलाब पाटील, गोलू पाटील उपस्थित होते. प्रयास पाटील यांच्या तत्परतेमुळे बॅग परत मिळाल्याने सराफ सोनार यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT