esakal
जळगाव

Jalgaon News : दुसरीसोबत बोहल्यावर चढणारा दादला मंडप सोडून पळाला!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील मंगल कार्यालयात लालबाग येथील तरुणाचा विवाह शुक्रवारी (ता. १२) होता.

वाजतगाजत नवरदेवाची वरात मंडपात पोहचली खरी मात्र आधीच लिव्ह ॲन्ड रिलेशनशिप’मध्ये असलेल्या मुलीने नवऱ्या मुलाचे पितळ उघड केल्याने अक्षता पडण्यापूर्वी लग्न रोखण्यात आल्याने मंगल कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. (2 nd marriage of husband stop by wife jalgaon news)

तत्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करुन लिव्ह ॲन्ड रिलेशनशिप’मध्ये असलेल्या दोघांना पोलिस ठाण्यात आणून हा विवाह सामंजस्याने मोडण्यात आला.

लालबाग येथील वैभव महाजन या मुलाचा विवाह बऱ्हाणपूर येथील दुसऱ्या समाजातील मुलीशी पुणे येथील देहू अनलंकापुरी येथे १० एप्रिलला संपन्न झाला होता. वैभव आपल्या घरी लालबाग आला असता आईची तब्ब्येत खराब असल्याने तिला मानसिक धक्का बसेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे विवाहाबद्दल घरात कुणालाही काहीएक न सांगता समाजातील मुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. रावेर तालुक्यातील मुलीला व लालबागला मुलाला हळद लागली. दरम्यान विवाह केलेल्या मुलीने त्यास भ्रमणध्वनी केला.

मात्र त्याने तो बंद करून ठेवला. यामुळे तिचा संशय बळावला. तिने मिळालेल्या माहितीनुसार रावेर गाठले. नवरदेवाची वरात व आप्तेष्ठ वाजत गाजत मंडपात पोहोचताच तिने या विवाहास रोखून हस्तक्षेप केला. यावेळी लग्न मंडपपात गोंधळ उडाला. दरम्यान काहींनी या बाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने वेळीच अनर्थ टळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT